ऐश्वर्या राय बद्दल अभिषेक असं काय म्हणाला? ‘माझी बायको मला…’
Aishwarya Rai Bachchan – Abhishek Bachchan: बॉलिवूडचा ज्यूनियर बच्चन म्हणजे अभिनेता अभिषेक बच्चन कायम त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतो. आता देखील अभिनेत्याने त्याच्या कुटुंबियांबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. एवढंच नाही तर, अभिनेत्री आणि बायको ऐश्वर्या राय हिच्याबद्दल देखील अभिषेकने मोठं वक्तव्य केलं आहे. नुकताच झालेल्या मुलाखतीत अभिषेक याने कुटुंबियांसोबत सतत होत असलेल्या तुलनेबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं आहे.
महानायक अमिताभ बच्चन यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, वयाच्या 82 व्या वर्षी देखील बॉलिवूडमध्ये सक्रिय आहेत. वडिलांप्रमाणे अभिषेक याला देखील वयाच्या 82 व्या वर्षापर्यंत काम करायचं आहे. कुटुंबातील सर्व सदस्यांमध्ये माझं नाव घेतलं जाणं ही अभिमानाची बाब असल्याचंही अभिषेक म्हणाला. जेव्हा अभिषेकची तुलना वडिलांशी किंवा त्यांच्या कुटुंबाशी केली जाते तेव्हा त्यांना अभिमान वाटतो.
ऐश्वर्याबद्दल काय म्हणाला अभिषेक बच्चन
मुलाखतीत अभिषेक याने ऐश्वर्या हिचं देखील कौतुक केलं. ‘ऐश्वर्या आतापर्यंत जेवढं यश मिळवलं आहे, त्यावर मला गर्व आहे. स्वतःला सिद्ध करणं माझ्यासाठी कधीच सोपं नव्हतं. 25 वर्षांनंतर देखील तुम्हाला विचारण्यात येत आणि तुलना केली जाते. आता मला याची सवय झाली आहे.’
अभिनेता पुढे म्हणाला, या लोकप्रिय नावांमध्ये माझी गणना होत आहे म्हणून मी स्वतःला भाग्यवान मानतो. माझं कुटुंब माझं आहे. माझी बायको माझी आहे. मला त्या सर्वांचा आणि त्यांच्या कामगिरीचा अभिमान आहे…. सध्या सर्वत्र अभिषेकच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.
मुलाखतीत अभिषेक असं देखील म्हणाला की, त्याला वडिलांप्रमाणे वयाच्या 82 व्या वर्षापर्यंत काम करायचं आहे. अभिनेता म्हणाला, ‘मला माझ्या वडिलांसारखं व्हायचं आहे. मला असं वाटतं की, माझी लेक देखील म्हणेल माझे वडील वयाच्या 82 व्या वर्षी देखील काम करत आहेत…’
सांगायचं झालं तर, अभिषेक याच्या कुटुंबात प्रत्येक जण स्टार आहे. जेव्हा अभिषेक याने मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं, तेव्हा देखील त्याची तुलना वडील अमिताभ बच्चन यांच्यासोबत करण्यात आली. आज देखील अभिषेक याच्या करियरचा ग्राफ पाहून लोकं त्याची तुलना आई, वडील आणि पत्नीसोबत करतात. बच्चन कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती ग्लॅमर विश्वातील मोठं नाव आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List