नारायणगाव येथे भीषण अपघात; नऊजण मृत्युमुखी, पाच जखमी

नारायणगाव येथे भीषण अपघात; नऊजण मृत्युमुखी, पाच जखमी

पुणे आणि परिसरात अपघातांचे सत्र सुरुच आहे. आज पुणे-नाशिक महामार्गावर नारायणगाव परिसरात इंडियन ऑईल पेट्रोलपंपाजवळ झालेल्या भीषण अपघातात 9 जण ठार आणि पाच जण जखमी झाले. प्रवासी वाहतूक करणाऱया मॅक्झिमा गाडीला आयशर ट्रकने जोरदार धडक दिली. यानंतर मॅक्झिमा गाडी रस्त्यात बंद पडलेल्या एसटी बसवर धडकल्याने भयंकर अपघात घडला. मृतांमध्ये पाच जण जुन्नर तालुक्यातील कांदळी गावचे रहिवाशी आहेत. अपघातानंतर कांदळी परिसरात शोककळा पसरली आहे.

सकाळी दहाच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. नाशिकहून पुण्याकडे जाणारी एसटी बस बंद पडल्याने रस्त्याच्या कडेला उभी होती. त्याचवेळी मागून प्रवासी वाहतूक करणारी मॅक्झिमा गाडी येत होती. त्याच्यामागे भरधाव वेगाने आयशर ट्रकने मॅक्झिमा गाडीला जोरात धडक दिली. त्यानंतर मॅक्झिमा गाडी बंद पडलेल्या एसटी बसवर आदळली. हा अपघात एवढा भीषण होता की, मॅक्झिमा गाडीतील नऊ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच प्रवासी जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी जखमींना नारायणगाव रुग्णालयात दाखल केले. दरम्यान भयंकर अपघातानंतर आयशर ट्रकचालक फरार झाला. नारायणगाव बायपासवर ट्रक उभा करून चालक पसार झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

पाच लाखांची मदत

या अपघातानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पाच लाख रूपयांची मदत जाहीर केली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

शिवानी सोनारच्या लग्नातील ‘उत्साही कार्यकर्ते’, घरी लग्नविधींना सुरुवात शिवानी सोनारच्या लग्नातील ‘उत्साही कार्यकर्ते’, घरी लग्नविधींना सुरुवात
झगमगत्या विश्वात सध्या लग्नाचे वारे वाहत आहेत. फक्त बॉलिवूड सेलिब्रिटीच नाही तर, मराठी सेलिब्रिटी देखील नव्या आयुष्याची सुरुवात करत आहे....
वेबसीरिज – बॅड कॉप : साधीसोपी, परंतु खुसखुशीत
फोटो, व्हिडीओ, प्रचार साहित्यावर एआय जनरेटेड लिहा; आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वापरावर निवडणूक आयोगाचा नवा नियम
मराठी भाषिकांच्या न्यायासाठी दावा ताकदीने लढावा, सीमाबांधवांचा टाहो; कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
नारायणगाव येथे भीषण अपघात; नऊजण मृत्युमुखी, पाच जखमी
मुंबई गुन्हे शाखेचा दरारा संपला, खबऱ्यांचे नेटवर्क तकलादू
सैफवर हल्ला करणारा अजूनही मोकाटच, 30हून अधिक पथके घेताहेत शोध