‘या’ चुकांमुळे तुमच्या केसांची वाढ मंदावते, तज्ज्ञ उपाय जाणून घ्या
केसांची वाढ योग्य पद्धतीने होणे हा अनेकांचा महत्वाचा विषय आहे. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात चुकीच्या खानपानामुळे आरोग्याबरोबरच केसांवर देखील त्याचे वाईट परिणाम होत असतात. अशावेळी केस गळतीमुळे केसांची वाढही मंदावते, केस पातळ होऊन गळू लागतात. बहुतेक लोकं या समस्येने त्रस्त आहेत. केवळ वयोवृद्धच नव्हे तर तरुण वर्ग केसांशी संबंधित समस्यांनी त्रस्त आहेत. त्वचारोग तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, यामध्ये तणाव, चुकीचा आहार, अनुवांशिकता आणि हार्मोनल असंतुलन यासारख्या समस्या उद्भवल्यामुळे केसांची वाढ योग्य पद्धतीने होत नाही.
आयुर्वेदिक डॉ. मनीषा मिश्रा सांगतात की, कधीकधी केस गळणे हे हेअर सायकलमुळेदेखील होते, पण वारंवार केस गळत असतील तर त्याचा ही केसांच्या वाढीवर परिणाम होतो. अशावेळी केसांची वाढ वाढवण्यासाठी लोकं डाएटपासून ट्रीटमेंटपर्यंत अनेक गोष्टी करतात. पण तरीही त्यांना हवे तसे परिणाम मिळत नाही. पण तुमच्या या चुकांमुळे सुद्धा केसांची वाढ मंदावण्यास सुरुवात होते, असे तज्ज्ञांनी सांगितले आहे. चला जाणून घेऊयात.
इंटरमिटेंट फास्टिंग
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, आजकाल अधूनमधून उपवास करण्याचा ट्रेंड खूप दिसून येत आहे. जे लोकं डायटिंग करत आहेत ते या डाएट प्लॅनला खूप फॉलो करत आहेत. तुम्ही देखील अधूनमधून उपवास करत असाल तर तुमच्या केसांच्या वाढीवर देखील याचा परिणाम होऊ शकतो. यामुळे पोषक तत्वांची कमतरता निर्माण होते. कारण तुम्ही उपवासाच्या वेळी कोणतेच आहार सेवन करत नाही त्यामुळे शरीरात पुरेशा पोषक तत्वांची कमतरता भासू लागते जे केसांच्या वाढीसाठी समस्या निर्माण करतात.
हार्मोन असंतुलन
तज्ञाच्या म्हणण्यानुसार हार्मोन्सच्या असंतुलनाचा देखील केसांच्या वाढीवरही परिणाम होतो. पित्ताच्या त्रासामुळे हार्मोन्स असंतुलन देखील होऊ शकतात. यामुळे केस अधिक कमकुवत होतात. विशेषत: महिलांनी हार्मोनल बदलांची अधिक काळजी घ्यावी, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचा आहार योग्य ठेवणे.
जास्त ताण आणि बाहेर खाणे
आयुर्वेद तज्ज्ञ मनीषा मिश्रा म्हणतात की, केसांची वाढ मंदावण्यामागे अतिताण देखील कारणीभूत आहे. तुम्ही जितका जास्त ताण घेता, तितकाच त्याचा केसांच्या आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे मेडिटेशन आणि योगाभ्यास करा. तसेच बाहेरचे जंकफूड पदार्थ खाणे टाळा. जास्त सोडियम आणि मसाले असलेल्या गोष्टी केसांच्या वाढीस परिणाम करतात.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List