जमिनीवर पडलेले पदार्थ पटकन तोंडांत टाकता का? डॉ. श्रीराम नेनेंनी पाहा काय सांगितलं
अनेकजणांना जेवताना अन्न किंवा एखादा पदार्थ वैगरे जमिनीवर पडलं तर ते उचलून पटकन तोंडात टाकण्याची सवय असते. किंव ते आपल्याकडून अगदी सहजपणे घडतं. पण असे केल्याने आपण आजरी पडू शकतो का? असा विचारपण आपण कधी केला नसेल.
जमिनीवर अन्न उचलून खाल्ल्याने काय परिणाम होतात?
खाली जमिनीवर पडलेले अन्न उचलून खाल्ल्याने काय परिणाम होतात? किंवा ही सवय नेमकी कसा परिणाम करते याबद्दल माधुरी दीक्षितचे डॉक्टर पती श्रीराम नेने यांनी काय सांगितलं ते पाहुयात.
एखादा पदार्थ खाताना अचानक तो पदार्थ किंवा त्या पदार्थाचा तुकडा जमिनीवर पडतो आणि नकळत तो आपण उचलून सहजपणे खातो. पण ही सवय खरंच काही परिणाम करते का?
डॉक्टर पती श्रीराम नेने यांनी काय मत मांडल?
तर याबद्दल यापूर्वी एका संशोधनात हे सिद्ध करण्यात आलं आहे की खाताना जर तो पदार्थ खाली पडला अन् तो काही सेकंदात उचलला तर तो खाण्यालायक राहतो अन्यथा त्याचा त्रास होऊ शकतो.
पण याबद्दल माधुरी दीक्षितचे डॉक्टर पती श्रीराम नेने यांनी काय मत मांडल आहे जाणून घेऊयात. खाली पडलेले अन्न उचलून 5 सेकंदात खाल्ले तर ते खाण्यायोग्य राहते असं म्हटलं जातं. पण यावर आता माधुरी दीक्षितचे पती आणि हृदय शल्यचिकित्सक डॉ. श्रीराम यांनी यावर आपले मत मांडले आहे. त्यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हीडीओ शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे.
जमिनीवर पडलेले अन्न उचलून खाणे किती योग्य आहे?
“जमिनीवर पडलेल्या पदार्थ उचलून खाणे योग्य आहे का?” या प्रश्नाचे उत्तर आयुर्वेदिक दृष्टिकोनातून दिले जाते. त्यानुसार, जमिनीवर पडलेली खाद्य वस्तू उचलून खाणे हे आरोग्याच्या दृष्टीने चांगले मानले जात नाही.
जमिनीवरील धूळ, जंतू आणि अशुद्धता आपल्या शरीराला हानीकारक ठरू शकतात आणि जर ते पोटात गेले तर पचनसंस्थेवर देखील ताण पडू शकतो. त्यामुळे जमिनीवर पडलेले अन्न 5 सेकंदाच्या आधीच उचलले असेल तर त्यामुळे फारसा फरक पडणार नाही असं म्हटलं जातं. पण यावर डॉक्टर नेने यांनी त्यांचे मत स्पष्ट केले आहेत.
जमिनीवर पडलेले अन्नपदार्थ खाण्याचा धोका असतो का?
यावर डॉक्टर श्री राम नेने म्हणतात की, “जमिनीवर पडलेले अन्नपदार्थ खाण्याचा धोका नेमका पत्करायचाच कशाला? त्या जमिनीवर तुमचे बूट किंवा पाय लागलेले असतात जे तुम्हाला माहीतही नसेल. अशा परिस्थितीत जमिनीवर असलेले अनेक जीवाणू आणि घाण त्या खाली पडलेल्या पदार्थाच्या संपर्कात येतात.
अशा स्थितीत 5 सेकंदात पडलेले अन्न उचलून खाण्याची संकल्पना इथे चालू शकणार नाही. जमिनीवर पडलेले अन्न उचलणे आणि ते खाणे तुमच्यासाठी खूप धोकादायक ठरू शकते.”
तर अशापद्धतीने जमिनीवर पडलेला पदार्थ मुळातच पुन्हा उचलून खाणे आरोग्यासाठी चांगले नसतेच. त्यासाठी इथे 5 सेकंदाचा कोणताही नियम लागू होत नाही. त्यामुळे हे 5 सेकंदाचाही फंडा न वापरता जमिनीवर पडलेलं अन्न किंवा कोणताही पदार्थ खाऊ नये असेच नेने यांनी म्हटंल आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List