‘धरतीपुत्र नंदिनी’ फेम अमन जैस्वाल यांचा वयाच्या 22 वर्षी अपघातात मृत्यू
Aman Jaiswal died: दूरचित्रवाणी इंडस्ट्रीमधील ‘धरतीपुत्र नंदिनी’ फेम अमन जैस्वाल यांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. ते फक्त 22 वर्षाचे होते. त्यांच्या अपघातासंदर्भात लेखक धीरज मिश्रा यांनी ‘इंडिया टुडे’ला दुजोरा दिला आहे. त्यांनी म्हटले की, अमन जैस्वाल ऑडिशन देणार होते. परंतु मुंबईतील जोगेश्वरी महामार्गावर त्यांच्या दुचाकीला ट्रकने धडक दिली. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला.
कोण आहे अमन जैस्वाल
अमन जैस्वाल हे उत्तर प्रदेशातील बलिया येथील रहिवासी होते. ‘धरतीपुत्र नंदिनी’मध्ये अमन मुख्य भूमिकेत दिसले होते. याशिवाय अमन यांनी सोनी टीव्हीच्या ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई‘ या मालिकेमध्ये यशवंत राव यांची भूमिका साकारली होती. हा शो जानेवारी 2021 मध्ये सुरू झाला होता. ऑक्टोबर 2023 मध्ये संपला. अमन यांनी आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली होती.
अमन यांनी बाईक चालवण्याची चांगली आवड होती. ते कुठेही आपल्या बाईकनेच प्रवास करत होते. त्यांचे इंस्टाग्रामवर अनेक व्हिडिओ बाइक राइड करतानाचे आहे. ते एक चांगले गायकसुद्धा होते. त्यांचे अनेक व्हिडिओ गिटार वाजवतानाचे आहे. अमन यांच्या अपघाती मृत्यूमुळे त्यांच्या अनेक चाहत्यांना धक्का बसला आहे. धरतीपुत्र नंदिनीची टीम धक्क्यात आहे.
अमन यांचा मित्र अभिनेश मिश्रा यांनी त्यांच्या अपघाताबद्दल म्हटले आहे की, अमन यांच्या गाडीचा अपघात झाल्याची माहिती मिळताच त्याला रुग्णालयात नेण्यात आले. परंतु रुग्णालयात पोहोचल्यानंतर अर्ध्या तासाने त्यांचा मृत्यू झाला. अमन ऑडिशनसाठी स्क्रीन टेस्ट शूट करण्यासाठी सेटवर जात होता. या दरम्यान त्यांचा अपघात झाला. टीव्ही अभिनेता अमन जैस्वाल यांनी 2023 मध्ये नजरा टीव्हीवर सुरू झालेल्या धरतीपुत्र नंदिनी या मालिकेत मुख्य भूमिका केली. त्यापूर्वी अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये छोट्या भूमिकांमध्ये दिसला होता.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List