गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणात मोठी बातमी, अखेर वर्षभरानंतर या आरोपीला बेड्या
Mumbai Crime News: कल्याणमधील शिवसेना नेते महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार प्रकरणात माजी आमदार गणपत गायकवाड यांना अटक झाली होती. परंतु या प्रकरणात इतर आरोपी काही वर्षापासून फरार आहेत. आता गोळीबार प्रकरणात फरार असलेल्या साहाव्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. नागेश बडेराव या आरोपीला कल्याण क्राईम ब्रँचने नाशिकमधून अटक केली आहे.
चार आरोपी यापूर्वीच कारागृहात
उल्हासनगरमध्ये पोलीस स्टेशनमध्ये आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. या प्रकरणात गणपत गायकवाड व इतर चार आरोपी आधीच जेलमध्ये आहे. परंतु गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड व आणखी एक आरोपी अद्याप फरार आहे.
नागेश बडेराव याला अटक
2 फेब्रुवारी 2024 रोजी उल्हासनगर पोलिस ठाण्यात महेश गायकवाड यांच्यावर आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला होता. त्या घटनेनंतर एकच खळबळ उडाली होती. महेश गायकवाड यांची प्रकृती गंभीर होती. त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. त्या घटनेतून ते बचावले. या प्रकरणात गणपत गायकवाड आणि इतर चार आरोपींना अटक झाली आहे. परंतु गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड अजूनही फरार आहे. या प्रकरणात फरार असलेला नागेश बडेराव याला गुरुवारी अटक झाली.
महेश गायकवाड यांनी केली होती पुरस्काराची घोषणा
दोन दिवसांपूर्वी महेश गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यात त्यांनी वैभव गायकवाड याच्यावर अनेक आरोप केले होते. वैभव गायकवाड हा भाजपचा पदाधिकारी आहे. त्यामुळे पोलीस राजकीय दबावात काम करत आहेत. ज्या पोलिसांनी वैभव गायकवाड त्याला पकडले, त्यांना २५ हजारांचा पुरस्कार देण्याची घोषणा महेश गायकवाड यांनी केली होती.
आरोपी आमदार महेश गायकवाड तळोजा कारागृहात आहे. परंतु ते अनेकवेळा पनवेल येथील फार्म हाऊसवर येतात, असा आरोप महेश गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत केला होता. त्या आमदाराचे नाव मात्र महेश गायकवाड यांनी सांगितले नव्हते.
हे ही वाचा…
‘कारागृहातील आरोपी आमदाराच्या फार्म हाऊसवर जातो…’, गणपत गायकवाड यांच्यावर महेश गायकवाड यांचा आरोप
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List