मुंबईवरुन कोकण-गोव्यात जाणाऱ्यांसाठी चांगली बातमी, 26 जानेवारीपासून मिळणार ही नवीन सुविधा

मुंबईवरुन कोकण-गोव्यात जाणाऱ्यांसाठी चांगली बातमी, 26 जानेवारीपासून मिळणार ही नवीन सुविधा

Mumbai Goa Highway Second Tunnel in Kashedi Ghat: मुंबई-गोवा महामार्गाबाबत गेल्या काही वर्षांपासून चर्चा होत आहे. या महामार्गाचे काम रखडले आहे. गेली अठरा वर्षे झाली या महामार्गाचे काम पूर्ण झाले नाही. या महामार्गाच्या अपूर्ण कामांमुळे गोवा अन् कोकणला जाणारे वाहनधारक संतप्त आहेत. दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांनी या महामार्गासाठी डिसेंबर 2024 ची दिलेली डेडलाईन आता हुकली आहे. परंतु त्यातील एक चांगली बातमी आली आहे. या महामार्गावरील कशेडीतील दोन्ही बोगदे 26 जानेवारीपासून पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुले होणार आहेत.

कशेडी येथील पहिल्या बोगद्यातून दोन्ही बाजूकडील वाहतूक सुरळीत सुरू आहे. दुसऱ्या बोगद्यात तात्पुरत्या स्वरूपातील वीजपुरवठा कार्यान्वित करण्यात आला होता. कायमस्वरूपी वीजपुरवठ्यासाठी विद्युतीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. विद्युतीकरणाची कामे जवळपास पूर्ण झाल्यावर दोन्ही बोगदे 26 जानेवारीपासून पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुले होतील.

45 मिनिटांचा प्रवास 8 मिनिटांत

मुंबई-गोवा महामार्गावर सर्वांत अवघड आणि धोकेदायक कशेडी घाट आहे. या घाटात सुमारे दोन किलोमीटरचे येण्या-जाण्यासाठी दोन स्वतंत्र बोगदे केले आहे. कशेडी बोगदा पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यावर वाहनधारकांना चांगला दिलासा मिळणार आहे. या महामार्गावर बोगद्याच्या परिसरात 45 मिनिटांचा असणारा प्रवास 8 मिनिटांत होणार आहे. यामुळे कोकणवासियांचा रस्ते प्रवास अधिक सुखकर होणार आहे.

मुंबई-गोवा हा महामार्ग कोकणवासीयांसाठी महत्वाचा आहे. 503 किलोमीटरचा महामार्ग कोकणातून जातो. हा महामार्ग पूर्ण झाल्यावर कोकणातील पर्यटन वाढणार आहे. तसेच जेएनपीटीमधील कंटेनरची वाहतूक करणारे भारतामधील सर्वात मोठे बंदर आणि निर्माणाधीन असलेले दिघी बंदर या महामार्गाला जोडली जातात. त्यामुळे व्यापारी वाहतूकही मोठ्या प्रमाणावर होते. मुंबई कोकणातील असंख्य चाकरमाने राहतात. ते गणपती, होळी किंवा इतर वेळी गावी जात असतात. त्या काळात रेल्वे आरक्षण फुल्ल असते. त्यामुळे त्यांच्यासाठी रस्ते प्रवास सोयीचा होतो. परंतु महामार्गाचे काम पूर्ण नसल्यामुळे त्यांना अनेक अडचणी येतात. बोगदे पूर्ण होत असले तरी महामार्ग कधी पूर्ण होणार? हा प्रश्न कोकणवासियांना आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Narendra Modi : नौदलाच्या जहाजांचे लोकार्पण, इस्कॉन मंदिरातही जाणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत, कसा असेल दौरा ? Narendra Modi : नौदलाच्या जहाजांचे लोकार्पण, इस्कॉन मंदिरातही जाणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत, कसा असेल दौरा ?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज महाराष्ट्र दौरा आहे. आज ते मुंबई आणि नवी मुंबईत उपस्थित राहणार आहेत, तसेच विधानसभा निवडणुकीतील...
Indian Navy : आता शत्रुची खैर नाही, आज देशाला मिळणार 3 शक्तीशाली युद्धनौका, खासियत काय?
एकाच घरात दोन पत्नींसोबत कसे राहतात सलमान खानचे वडील? स्वत:च केला खुलासा
मराठमोळ्या रसिका सुनीलचा बोल्ड अंदाज; इन्स्टाग्राम हॅकरचा घेतला असा सूड
बुद्धी भ्रष्ट झाली आहे हिची…, अंकिता लोखंडेला हिजाबमध्ये पाहताच भडकले चाहते, व्हिडीओ व्हायरल
आरटीई’ ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया पारदर्शक असल्याचा खुलासा करा, शिक्षण आयुक्तांकडे शिवसेनेची मागणी
दक्षिण आफ्रिकेत उपासमारीमुळे बेकायदेशीर 100 खाण कामगारांचा मृत्यू, 500 जण अडकल्याची भीती