पाकिस्तानातील डोनाल्ड ट्रम्प विकताहेत खीर
पाकिस्तानातील पंजाब प्रांतात राहणाऱ्या आणि हुबेहूब डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारख्या दिसणाऱ्या एका व्यक्तीची पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. या व्यक्तीचे नाव बग्गा असून ते 53 वर्षांचे आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखे दिसत असल्याने ते नेहमी कौतुकाचा विषय ठरतात.
ते शहरात खीर विकून आपला उदरनिर्वाह करतात. बग्गा हे एल्बिनिजम आजाराने ग्रस्त आहेत. खीर विकत असलेल्या दुकानात खवय्यांची मोठी गर्दी होते. अनेक जण खीर खाल्ल्यानंतर त्यांच्यासोबत सेल्फी घेतात. बग्गा यांचा चेहरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्याशी मिळताजुळता आहे. चाहत्यांच्या व्हिडीओतून त्यांनी खऱ्याखुऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना पाकिस्तानात येण्याचे निमंत्रणसुद्धा दिले आहे. डोनाल्ड ट्रम्पसाहेब, तुम्ही निवडणूक जिंकलात. आता एकदा पाकिस्तानात या आणि माझी खीर खा. तुम्हाला चांगली वाटेल, असे बग्गा व्हिडीओत म्हणत आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List