महाराष्ट्राच्या लॉटरीवर घाला! सरकारकडून बंदी घालण्याच्या हालचाली सुरू, आंदोलन करण्याचा लॉटरी विक्रेता सेनेचा इशारा

महाराष्ट्राच्या लॉटरीवर घाला! सरकारकडून बंदी घालण्याच्या हालचाली सुरू, आंदोलन करण्याचा लॉटरी विक्रेता सेनेचा इशारा

अंध, अपंग, वृद्ध, महिला, बेरोजगार तरुणांना रोजगार मिळावा आणि जुगारावर नियंत्रण राहावे यासाठी महाराष्ट्र सरकारने 1969 मध्ये सुरू केलेल्या महाराष्ट्र राज्य लॉटरीवर घाला घालण्यात येत असून राज्य सरकारकडून बंदी घालण्याच्या हालचाली सुरू आहेत. दरम्यान, लॉटरीवर बंदी घातली तर लाखो लॉटरी विक्रेते रस्त्यावर उतरून आंदोलन करतील, असा इशारा लॉटरी विक्रेता सेनेने दिला आहे.

महाराष्ट्र राज्य लॉटरी ही देशात गेली पाच दशके विश्वसनीय, पारदर्शक आणि आदर्श लॉटरी म्हणून ओळखली जाते. या लॉटरीवर लाखो लोकांचे घर चालते, उदरनिर्वाह चालतो. मात्र भाजप सरकारने आता ही लॉटरी बंद करण्याच्या हालचाली सुरू केल्या असून विक्रेते तणावाखाली आहेत.

लॉटरी राहिली तर लाखो विक्रेत्यांचा रोजगार टिकून राहील, मात्र ही लॉटरी बंद केली तर लाखो विक्रेते आणि त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येईल. त्यामुळे राज्य सरकारने याची गंभीरपणे दखल घेऊन बंदीसारखा कोणताही आततायी निर्णय घेऊ नये, असा इशारा लॉटरी विक्रेते सेनेने अध्यक्ष मनोज वारंग यांनी दिला आहे.

शिवसेनाप्रमुखांनी दिला होता दणका

केंद्र सरकारने 1997 साली महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी लॉटरी बंदीच्या प्रस्तावाला आक्रमकपणे विरोध केला होता. सरकारी महसुलापेक्षा लाखो विक्रेत्यांचे उदरनिर्वाह महत्त्वाचे आहेत. लॉटरी बंद झाली तर मी स्वतः रस्त्यावर उतरेन आणि विक्रेत्यांचे नेतृत्व करेन, असा आक्रमक पवित्रा शिवसेनाप्रमुखांनी घेतला होता. शिवसेनाप्रमुखांच्या या आव्हानामुळे केंद्र सरकारने बंदीचा निर्णय मागे घेतला होता.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘अबोली’ मालिकेत दोन नायिकांची धमाकेदार एण्ट्री; एक ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्री तर दुसरी.. ‘अबोली’ मालिकेत दोन नायिकांची धमाकेदार एण्ट्री; एक ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्री तर दुसरी..
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘अबोली’ या मालिकेचं कथानक दिवसेंदिवस उत्कंठावर्धक होतंय. लवकरच कथानकातलं गूढ आणखी वाढणार आहे, कारण मालिकेत इन्स्पेक्टर दिपशिखा...
Shah Rukh Khan: मी गे आहे म्हणून…, शाहरुख खानचं मोठं वक्तव्य, अभिनेता असं का म्हणाला?
‘महाकुंभ’मधील सुंदर ‘साध्वी’चीच चर्चा; रातोरात इन्स्टाग्रामवर वाढले इतके फॉलोअर्स
26 वर्षांनी लहान गर्लफ्रेंडशी लग्न; वर्षभरातच पत्नीचं धर्मांतर, इस्लाम धर्म स्वीकारण्यावरून नेटकऱ्यांची टीका
जसा दिसतो तसं लिहितो…, हृतिक रोशनचं हस्ताक्षर पाहून चाहत्यांच्या उंचावल्या भुवया
पुण्यात 10 किलोमीटरसाठी 25 मिनिटांचा वेळ, पोलिसांचा दावा : उपाययोजनांमुळे वाहतूक नियमन सुधारले
भाजप नेत्याकडून महिलेवर बलात्कार, गुन्हा दाखल