Pune news – दुचाकीस्वार ज्येष्ठाला मांजाचा फास; संभाजीनगरमध्येही पोलिसाचा गळा कापला

Pune news – दुचाकीस्वार ज्येष्ठाला मांजाचा फास; संभाजीनगरमध्येही पोलिसाचा गळा कापला

नायलॉन मांजावर बंदी असतानादेखील त्याची छुप्या पद्धतीने विक्री होत असल्याचे दिसून आले आहे. मांजाचा फास बसून पुण्यातील ज्येष्ठ दुचाकीस्वार आणि छत्रपती संभाजीनगरमधील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दीपक पारधे गंभीर जखमी झाले आहेत. दोघांवर रुग्णालयात उपचार करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पुण्यात दुचाकीस्वार ज्येष्ठ नागरिकाला मांजाने कापल्याची घटना मंगळवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास शिवाजी पुलावर घडली. यामुळे ज्येष्ठाच्या गालाला आणि अंगठ्याला गंभीर दुखापत झाली आहे. प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. देवराम दत्तात्रय कामठे (वय 67, रा. पुरंदर, सध्या रा. शिवाजीनगर) असे जखमीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार कामठे हे मंगळवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास शिवाजीनगर गावठाणातून शनिवारवाड्याच्या दिशेने जात होते. त्याच वेळी अचानक त्यांच्यासमोर मांजा आला. त्यांनी प्रसंगावधान दाखवीत हाताने मांजा दूर केला. मात्र, मांजाचा फास त्यांच्या अंगठ्याला आणि गालाला बसला. त्यामुळे ते जखमी झाले.

दरम्यान, शहरात मागील काही दिवसांपासून गुन्हे शाखेकडून वारंवार कारवाई करूनही मांजा विक्रेत्यांसह डीलर्सही बेशिस्तपणे मांजाची विक्री करीत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे नागरिकांसह पशू-पक्षीही जखमी होत आहेत.

संभाजीनगरमध्ये पोलीस जखमी

दुचाकीवरून कामावर जात असताना पोलीस उपनिरीक्षक दीपक पारधे यांच्या गळ्याला मांजा लागून ते गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवारी दुपारी छत्रपती संभाजीनगर परिसरात घडली आहे. दरम्यान, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात तातडीने उपचार करण्यात आल्याने प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून चिनी मांजा विक्रेत्यांसह डीलर्सविरुद्ध पोलिसांनी कारवाई करूनदेखील मांजाची विक्री होत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. संबंधितांविरुद्ध कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘अबोली’ मालिकेत दोन नायिकांची धमाकेदार एण्ट्री; एक ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्री तर दुसरी.. ‘अबोली’ मालिकेत दोन नायिकांची धमाकेदार एण्ट्री; एक ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्री तर दुसरी..
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘अबोली’ या मालिकेचं कथानक दिवसेंदिवस उत्कंठावर्धक होतंय. लवकरच कथानकातलं गूढ आणखी वाढणार आहे, कारण मालिकेत इन्स्पेक्टर दिपशिखा...
Shah Rukh Khan: मी गे आहे म्हणून…, शाहरुख खानचं मोठं वक्तव्य, अभिनेता असं का म्हणाला?
‘महाकुंभ’मधील सुंदर ‘साध्वी’चीच चर्चा; रातोरात इन्स्टाग्रामवर वाढले इतके फॉलोअर्स
26 वर्षांनी लहान गर्लफ्रेंडशी लग्न; वर्षभरातच पत्नीचं धर्मांतर, इस्लाम धर्म स्वीकारण्यावरून नेटकऱ्यांची टीका
जसा दिसतो तसं लिहितो…, हृतिक रोशनचं हस्ताक्षर पाहून चाहत्यांच्या उंचावल्या भुवया
पुण्यात 10 किलोमीटरसाठी 25 मिनिटांचा वेळ, पोलिसांचा दावा : उपाययोजनांमुळे वाहतूक नियमन सुधारले
भाजप नेत्याकडून महिलेवर बलात्कार, गुन्हा दाखल