लक्षवेधक – अबब! 8 फूट रुंदीचा टीसीएल टीव्ही लाँच

लक्षवेधक – अबब! 8 फूट रुंदीचा टीसीएल टीव्ही लाँच

टेक कंपनी टीसीएलने जगातील सर्वात मोठा स्मार्ट टीव्ही लाँच केला आहे. हा टीव्ही तब्बल 115 इंचाचा असून 8 फूट रुंद आणि 90 किलो वजनाचा आहे. हा टीव्ही आयमॅक्स थिएटरची मजा देऊ शकतो. टीसीएल एक्स955 मॅक्स स्मार्ट टीव्ही खूपच स्लीम आणि बेजल लेस डिझाईनसोबत आणला आहे. या टीव्हीची किंमत 29 लाख 29 हजार 990 रुपये असून या टीव्हीला प्री बुकिंग केल्यास ग्राहकांना 75 इंचाचा टीव्ही फ्री मिळणार आहे.

सियाचीन ग्लेशियरवर जिओचा 5जी मोबाइल टॉवर

जगातील सर्वात उंच युद्धभूमी अशी ओळख असलेल्या सियाचीन ग्लेशियर या ङ्गिकाणी रिलायन्स जिओ कंपनीने आपला पहिला 5जी मोबाइल टॉवर उभारला आहे. हिंदुस्थानी सैन्याच्या फायर अँड फ्युरी कॉर्प्स आणि जिओ टेलिकॉमच्या सहकार्याने ही किमया साधण्यात आली आहे. रिलायन्सने सोशल मीडियावरून याची माहिती दिली आहे. या ङ्गिकाणी तापमाण हे उणे 40 अंश सेल्सिअसपर्यंत आहे.

कॅलिफोर्नियातील आगीचा ऑस्कर सोहळ्यावर परिणाम

ऑस्कर 2025 ची नामांकने 17 जानेवारी रोजी जाहीर होणार होती, मात्र कॅलिफोर्नियातील जंगलातील आगीमुळे ती पुढे ढकलण्यात आली. लॉस एन्जेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये 3 मार्च रोजी होणाऱ्या पुरस्कार सोहळय़ात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. लॉस एन्जेलिस येथे वणव्यामुळे शेकडो घरे जळून खाक झाली असून त्यात अनेक हॉलीवूड सेलिब्रिटींच्या घरांचा समावेश आहे. आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू झाला आहे.

विजेचे बिल भरण्यासाठी सात हजार रुपयांची चिल्लर

एका व्यक्तीला साधारणपणे सात हजार रुपये विजेचे बिल आले. बिल भरण्यासाङ्गी एक आणि दोन रुपयांची नाणी घेऊन तो वीज भरणा पेंद्रात पोहोचला. ही सात हजार रुपये मूल्याची नाणी मोजताना वीज कर्मचाऱ्यांच्या नाकीनऊ आले. साधारणपणे पाच तास ते नाणी मोजत होते. वाशिम जिह्यातील रिसोडमध्ये हा प्रकार घडला. महावितरणकडून थकीत वीज बील वसुली मोहीम सुरू आहे.  या प्रकारामुळे कर्मचाऱ्यांची चांगलीच परीक्षा झाली.

तामीळनाडूत जल्लीकट्टू स्पर्धेला दणक्यात सुरुवात

तामीळनाडूतील मदुराई जिह्यातील अवनियापुरम येथे 14 जानेवारीपासून जल्लीकट्टू स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेसाङ्गी 1100 बैल आणि 900 बैल-टेमर म्हणजेच बैलावर नियंत्रण मिळवणाऱ्या स्पर्धकांनी नोंदणी केली. जल्लीकट्टू स्पर्धा 14 ते 16 जानेवारीपर्यंत चालणार आहे. बैलाला 11 लाख रुपये किमतीचा ट्रक्टर दिला जाईल, तर सर्वोत्तम बैल-टेमरला 8 लाख रुपये किमतीची कार आणि इतर बक्षिसे मिळतील.

अख्खा गाव सायलेंट मोडवर,टीव्ही, मोबाइल, रेडियो सगळं बंद

हिमाचल प्रदेशाला देवभूमी असे म्हणतात. तिथे अनेक प्रथा-परंपरा पाळल्या जातात. हिमाचल प्रदेशात असलेल्या शक्तिपीठांचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी लाखो भाविक देशभरातून येतात. हिमाचलच्या कुल्लू जिह्यात तर एक अनोखी परंपरा पाळली जाते. मकर संक्रांतीपासून अख्ख्या गावात सन्नाटा असतो. नऊ दिवस मंदिराचे प्रवेशद्वार बंद केले जाते. संपूर्ण गावात गोंगाट, गडबड करण्यास मनाई असते. कुल्लू जिह्यातील नगरी मनाली असे या भागाचे नाव आहे. आजपासून (मंगळवार) गावात पुढील 42 दिवस ना टीव्ही सुरू राहणार, ना मंदिरात पूजाअर्चा होणार. गावकऱ्यांचे मोबाइल सायलंट मोडवर असतील. अगदी रिंगटोनही वाजणार नाही. अगदी देवळातील घंटेचाही आवाज होणार नाही, याची खबरदारी घेतली जाते. कुणी गावकरी एकमेकांशी मोठ्या आवाजात बोलत नाहीत. दरवर्षी गावात न चुकता ही प्रथा पाळली जाते.

17 व्या वर्षी केमिस्ट्रीमध्ये पदवी, हिमाचलच्या अकृतचा आयक्यू 146

मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, असे म्हणतात ते उगीच नाही. हिमाचल प्रदेशमधील अकृत प्राण जसवाल या 7 वर्षीय मुलाने ही गोष्ट खरी करून दाखवली आहे. अकृत याचे वय फक्त 7 वर्षे होते तरीही त्याने कमी वयात बरीच मोठी कामगिरी करून दाखवली आहे. अवघ्या दोन वर्षांत तो लिहित आणि बोलत असे. इतक्या कमी वयात तो अस्खलीत इंग्रजी बोलत असे. अकृत 12 वर्षांचा झाला त्या वेळी तो हिंदुस्थानचा यंगेस्ट युनिव्हर्सिटी स्टुडेंट म्हणून ओळखला जाऊ लागला. अकृतचा आयक्यू 146 होता. आपल्या कमी वयात तो चंदिगड विद्यापीठात वैज्ञानिक शोध घेऊ लागला. अकृतने नंतर आयआयटी कानपूरमधून बायोइंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले. अवघ्या 17  व्या वर्षी त्याने केमिस्ट्रीमध्ये मास्टर पदवी मिळवली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘अबोली’ मालिकेत दोन नायिकांची धमाकेदार एण्ट्री; एक ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्री तर दुसरी.. ‘अबोली’ मालिकेत दोन नायिकांची धमाकेदार एण्ट्री; एक ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्री तर दुसरी..
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘अबोली’ या मालिकेचं कथानक दिवसेंदिवस उत्कंठावर्धक होतंय. लवकरच कथानकातलं गूढ आणखी वाढणार आहे, कारण मालिकेत इन्स्पेक्टर दिपशिखा...
Shah Rukh Khan: मी गे आहे म्हणून…, शाहरुख खानचं मोठं वक्तव्य, अभिनेता असं का म्हणाला?
‘महाकुंभ’मधील सुंदर ‘साध्वी’चीच चर्चा; रातोरात इन्स्टाग्रामवर वाढले इतके फॉलोअर्स
26 वर्षांनी लहान गर्लफ्रेंडशी लग्न; वर्षभरातच पत्नीचं धर्मांतर, इस्लाम धर्म स्वीकारण्यावरून नेटकऱ्यांची टीका
जसा दिसतो तसं लिहितो…, हृतिक रोशनचं हस्ताक्षर पाहून चाहत्यांच्या उंचावल्या भुवया
पुण्यात 10 किलोमीटरसाठी 25 मिनिटांचा वेळ, पोलिसांचा दावा : उपाययोजनांमुळे वाहतूक नियमन सुधारले
भाजप नेत्याकडून महिलेवर बलात्कार, गुन्हा दाखल