स्वकष्टाने उभारलेलं हे आमचं ‘एकम’..; अमृता खानविलकरचा नव्या घरात गृहप्रवेश
अभिनेत्री अमृता खानविलकर कायमच सोशल मीडियाद्वारे तिच्या कामाबद्दल आणि वैयक्तिक आयुष्यातले खास क्षण चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते. अशातच तिने सोशल मीडियावर नवीन वर्षात तिच्या नवीन घरी गृहप्रवेश केल्याचा खास व्हिडिओ पोस्ट केला आहे.
काही दिवसांपूर्वी तिने नवीन घर घेतल्याची बातमी प्रेक्षकांना दिली होती आणि आता तिने नव्या घरात गृहप्रवेश केला आहे. अमृताने मुंबईत हे नवकोर घर घेतलं असून 22 व्या मजल्यावर असलेलं हे घर अमृतासाठी नक्कीच खास आहे.
'नव्या वर्षाची.. नवी सुरुवात. गृहप्रवेश केला आणि नव्या घराचा उंबरठा ओलांडला. स्वकष्टाने उभारलेलं हे आमचं 'एकम'. एकम म्हणजे एक. जिथून सगळंच नव्याने सुरू होतं. उत्सुकता, समाधान, प्रेम, आणि डोळ्यात स्वप्नांचं आभाळ. तुमच्या शुभाशीर्वादांची साथ अशीच कायम राहू दे,' अशी पोस्ट अमृताने लिहिली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List