बीडमध्ये राखेच्या डंपरची दुचाकीला धडक, एका सरपंचाचा जागीच मृत्यू
बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांची निघृण हत्या झाली होती. ही घटना ताजी असताना बीडमध्येच राखेच्या डंपरची दुचाकीला धडक लागली आहे आणि या अपघातात एका सरपंचाचा मृत्यू झाला आहे.
अभिमन्यू क्षीरसागर हे सौंदाना गावाचे सरपंच होते. ते आपल्या दुचाकीने जात होते, तेव्हा राखेच्या डंपरने त्यांना धडक दिली आणि याच डंपरने चिरडून त्यांचा मृत्यू झाला. परळीत राख आणि पवनचक्कीच्या प्रकरणात सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली होती. आता बीडमध्येच एका सरपंचाचा मृत्यू झाल्याने वाद निर्माण झाला आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी या अपघाताप्रकरणी संशय व्यक्त केला आहे. हा अपघात आहे की घातपात याची चौकशी झाली पाहिजे, तसेच बीडमध्ये राखेची अवैध वाहतूक सुरूच आहे असा आरोपही धस यांनी केला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List