साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 12 जानेवारी 2025 ते शनिवार 18 जानेवारी 2025

साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 12 जानेवारी 2025 ते शनिवार 18 जानेवारी 2025

>> नीलिमा प्रधान

मेष – फसगत टाळा

मेषेच्या दशमेषात सूर्य, शुक्र शनि युती. तुमच्या क्षेत्रात उन्नतीची चांगली संधी मिळेल. व्यवहार व भावना यांचा योग्य मेळ घाला. फसगत टाळता येईल. नोकरीत वर्चस्व, लाभ, शक्य. धंद्यात थकबाकी मिळवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रभावी मुद्दे मांडता येतील. लोकप्रियता, समाजकार्य वाढेल. कोर्टाची कामे करून घ्या.

शुभ दि. 12, 13

वृषभ- प्रत्येक दिवस प्रगतीकारक

वृषभेच्या भाग्येषात सूर्य, चंद्र मंगळ युती. प्रत्येक दिवस प्रगतीकारक ठरेल. कोणताही कठीण प्रश्न सोडवा. बोलताना मात्र तारतम्य ठेवा. नोकरीत कामाची प्रशंसा धंद्यात वाढ, नवे कंत्राट मिळेल. आत्मविश्वासात भर पडणारी घटना तुमच्या क्षेत्रात घडेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात नवे परिचय उत्साहवर्धक.

शुभ दि. 12, 14

मिथुन – नोकरीत सावध रहा

मिथुनेच्या अष्टमेषात सूर्य, चंद्र बुध त्रिकोणयोग. आरोग्याची काळजी घ्या. अरेरावी, भांडण करून तुमची समस्या अधिक जटील येईल. नम्रता, बुद्धिचातुर्य वापरून यश खेचा. नोकरीत, कामात सावध रहा. धंद्यात लाभ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अपमानास्पद वागणूक मिळेल. वरिष्ठांना काटशह देऊ नका.

शुभ दि. 12, 13

कर्क – भावनिक प्रश्न सोडवा

कर्केच्या सप्तमेषात सूर्य, चंद्र गुरू लाभयोग. भावनिक प्रश्न सोडवताना गुंता, तणाव, गैरसमज होईल. नात्यात, मैत्रीत वाद, नाराजी होईल. गोड बोलून समस्या सोडवा. धंद्यात हिशेब तपासा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात संमिश्र स्वरूपाच्या घटना घडतील. तुमच्या मनाविरुद्ध काम करावे लागतील.

शुभ दि. 16, 17

सिंह – प्रकृतीवर ताण येईल

सिंहेच्या षष्ठेषात सूर्य, शुक्र शनि युती. धावपळ, दगदग वाढेल. प्रकृतीची काळजी घ्या. राग अनावर होणाऱया घटना घडतील. प्रवासात सावध रहा. नोकरीत तणाव, काम वाढेल. धंद्यात लाभ, खर्च होतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कायद्याला धरून कामे करा. प्रतिष्ठा पणाला लावू नका. वेळ, प्रसंग पाहून तटस्थ भूमिका घ्या.

शुभ दि. 12, 13

कन्या – खर्च उद्भवतील

कन्येच्या पंचमेषात सूर्य, चंद्र गुरू लाभयोग. घरगुती कामे वाढतील. अचानक खर्च उद्भवेल. आपसांत तणाव, गैरसमज होतील. शब्द शस्त्रासारखे काम करतात. संयम ठेवा. व्यसन नको. फसगत टाळा. नोकरीत अशांतता राहील. धंद्यात दगदग जाणवेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात गुप्त कारवाया वाढतील. गोड बोलण्यावर भाळू नका.

शुभ दि. 12, 14

तूळ – धंद्यात लाभ होईल

तुळेच्या सुखस्थानात सूर्य, चंद्र बुध त्रिकोणयोग. चातुर्याने गोड बोलून काम करा. नोकरीत स्पर्धा वाढेल. धंद्यात लाभ होईल परंतु हिशेब तपासा. भावनांचा गुंता करू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात निश्चित निर्णय घेणे अवघड होईल. तटस्थ रहा. बुद्धिचातुर्याने प्रसंग निभावून न्या. महत्त्वाच्या वस्तू सांभाळा.

शुभ दि. 12, 13

वृश्चिक – व्यवहारात फसू नका

वृश्चिकेच्या पराक्रमात सूर्य, चंद्र गुरू लाभयोग. सप्ताहाच्या सुरूवातीला तणाव, वाद होतील. प्रवासात घाई नको. तुमच्या कामाला योग्य प्रतिसाद मिळेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राखता येईल. धंद्यात नवा परिचय नीट तपासून घ्या. राजकीय, सामाजिक क्षेत्रात व्यवहारात फसू नका. नवा करार सावधपणे करा.

शुभ दि. 14, 17

धनु – नोकरीत कामे वाढतील

धनुच्या धनेषात सूर्य, शुक्र शनि प्रतियुती. सोपा वाटणारा प्रश्नसुद्धा अडचणी वाढवणारा असू शकतो हे लक्षात ठेवा. कोणताही धोका पत्करू नका. प्रकृतीची काळजी घ्या. नोकरीत कामे वाढतील. यांत्रिक बिघाडावर खर्च होईल. व्यवसायात वसुली करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात गुप्त कारस्थानांना कमी लेखू नका.

शुभ दि. 12, 13

मकर – शब्द जपून वापरा

स्वराशीत सूर्य, बुध गुरू षडाष्टक योग. कोणालाही आश्वासन देण्याची घाई करू नका. भावनेच्या भरात फसगत करून घेऊ नका. शब्द जपून वापरा. कायदा पाळा. साडेसाती सुरू आहे. नोकरीत कामाचे कौतुक होईल. धंद्यात लाभ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अभ्यासपूर्वक कामे करा. योजना बनवा. प्रतिष्ठा वाढेल. वाद वाढवणारे प्रसंग दूर ठेवा.

शुभ दि. 14, 15

कुंभ – वाद वाढवू नका

कुंभेच्या व्ययेषात सूर्य, चंद्र बुध त्रिकोणयोग. शाब्दिक चकमक वाढवू नका. चातुर्याने बोला. वैर वाढण्यास वेळ लागत नाही परंतु मैत्री सोपी नसते. नोकरीत लक्षपूर्वक निर्णय घ्या. धंद्यात धावपळ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्या अपरोक्ष काही निर्णय घेतले जातील. क्षुल्लक वाद वाढवू नका. घरगुती कामे वाढतील.

शुभ दि. 12, 13

मीन – अनाठायी खर्च होतील

मीनेच्या एकादशात सूर्य, चंद्र मंगळ युती. नात्यात, मैत्रीत गैरसमज, वाद होतील. सावध रहा. अनाठायी खर्च होतील. व्यसन नको. नोकरीत प्रभाव राहील. धंद्यात स्वत लक्ष ठेवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वरिष्ठ तुमचे कौतुक करतील. जवळच्या व्यक्ती निष्कारण स्पर्धा करतील. द्वेष करतील. नम्रता ठेवा.  माणसे ओळखून ठेवा.

शुभ दि. 13, 14

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

प्रवाशांनो कृपया लक्ष द्या..! आज रेल्वेच्या तिन्हीही मार्गांवर मेगाब्लॉक, वेळापत्रक कसं असणार? प्रवाशांनो कृपया लक्ष द्या..! आज रेल्वेच्या तिन्हीही मार्गांवर मेगाब्लॉक, वेळापत्रक कसं असणार?
Mumbai Local Mega Block News : आज रविवार असल्याने असंख्य मुंबईकर हे फिरण्यासाठी, शॉपिंगसाठी घराबाहेर पडतात. तुम्हीही आज असाच काही...
आवडत्या मालिकांमधील लाडक्या कलाकारांनी साजरा केला उत्सव मकरसंक्रांतीचा
न्यू इअर पार्टीतील आर्यन खानच्या मद्यपानाच्या व्हिडीओवर समीर वानखेडे स्पष्टच बोलले..
सुकेश चंद्रशेखरचे तुरुंगातून लिहिले अर्थमंत्र्यांना पत्र, हजारो कोटी रुपयांचा टॅक्स भरण्याची दाखवली तयारी
कर्जतकरांच्या ताटात भेसळीची तूरडाळ; परप्रांतीय विक्रेत्यांना पकडले
सायबर गुन्हेगारीचे धागेदोरे थेट चीन आणि इंडोनेशियापर्यंत; 530 व्हर्च्युअल नंबर पुरवले, एअरटेलच्या दोन व्यवस्थापकांना अटक
विद्यार्थिंनीना शर्ट काढून फक्त ब्लेझरवर घरी पाठवले, झारखंडच्या मुख्याध्यापकाचे धक्कादायक कृत्य