Photo – निखळ हास्य अन् मादक अदा…, काळ्या रंगाच्या लेहंग्यात राशा थडानीयाचा हटके लूक
रवीना टंडनची मुलगी राशा थडानी सध्या तिच्या आगामी ‘आझाद’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. राशा थडानीचा पहिला चित्रपट ‘आझाद’ 17 जानेवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे चाहत्यांना या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे.
दरम्यान राशा थडानीने नुकतेच एक फोटोशूट केले आहे. या फोटोतील राशाचा ग्लॅमरस लूक पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
ग्लॅमरल र्फोटोशूटसाठी राशाने काळ्या आणि सफेद रंगाचा लेहंगा परिधान केला आहे. यासोबतच हातात गोल्डन रंगाचा बँड घातला आहे.
स्मोकी आय मेकअप आणि मेसी हेअर लूकमध्ये ती सुंदर दिसतेय.
तिचा हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चाहत्यांनी तिच्या या फोटोंचे भरभरुन कौतुक केले आहे.
राशा थडानीचा पहिला चित्रपट ‘आझाद’ मधील काही गाणी प्रदर्शित झाली आहेत. तिच्या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान, राशानं ‘ओई अम्मा’ गाण्यावर डान्स केला. तिच्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List