‘माझी पत्नी खूप सुंदर, तिला पहायला आवडते’, एसएन सुब्रमण्यम यांच्या वक्तव्यावर आनंद महिंद्रा यांचे प्रत्युत्तर

‘माझी पत्नी खूप सुंदर, तिला पहायला आवडते’, एसएन सुब्रमण्यम यांच्या वक्तव्यावर आनंद महिंद्रा यांचे प्रत्युत्तर

एल अँड टीचे अध्यक्ष एसएन सुब्रमण्यम यांनी आठवड्यातील 90 तास काम करण्याचा सल्ला दिल्यानंतर सोशल मीडियावर ते ट्रोल होत आहेत. सुब्रमण्यम यांच्या या सल्ल्याची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. आता महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी देखील या चर्चेत सहभाग घेतला आहे. कामाच्या प्रमाणावर नाही त्याच्या गुणवत्तेवर लक्ष केंद्रित केले पाहिजे, कारण जग 10 तासात बदलू शकते, असे महिंद्रा यांनी म्हटले आहे. दिल्लीत राष्ट्रीय युवा महोत्सवाला संबोधित करताना महिंद्रा बोलत होते.

सोशल मीडियावर वाद सुरूच

एल अँड टीचे अध्यक्ष एस.एन. सुब्रमण्यम यांच्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर वाद निर्माण झाला आहे. “तुम्ही तुमच्या पत्नीकडे किती वेळ पाहू शकता,” असा प्रश्न त्यांनी विचारला होता. तसेच आठवठ्यात 90 तास काम केले पाहिजे, कर्मचाऱ्यांनी रविवारीही सुट्टी घेऊ नये असा सल्ला त्यांनी दिला होता. सुब्रमण्यम यांच्या वक्तव्याबाबत आनंद महिंद्रा यांनी इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती आणि इतरांबद्दल आदर व्यक्त केला आणि म्हणाले, “मला चूक करायची नाही पण मला काहीतरी सांगायचे आहे. मला वाटतं ही चर्चा चुकीच्या दिशेने जात आहे कारण ही चर्चा कामाच्या प्रमाणाबाबत आहे.”

काय म्हणाले महिंद्रा?

माझे म्हणणे आहे की, आपण कामाच्या प्रमाणावर नव्हे तर कामाच्या गुणवत्तेवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. हा 40 तास, 70 तास किंवा 90 तासांचा प्रश्न नाही. तुम्हाला कोणते परिणाम मिळत आहेत? भलेही ते 10 तास असले तरी, तुम्ही 10 तासांत जग बदलू शकता. तुमच्या कंपनीत असे लोक असले पाहिजेत जे हुशारीने निर्णय घेतील असे मी मानतो, असे महिंद्रा यांनी म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पाण्यामुळे नाही, फंगल इन्फेक्शन नाही…मग टक्कल पडतंय कसं? बुलढाण्यातील ग्रामस्थांना तपासण्यासाठी ‘या’ राज्यांमधून डॉक्टर येणार पाण्यामुळे नाही, फंगल इन्फेक्शन नाही…मग टक्कल पडतंय कसं? बुलढाण्यातील ग्रामस्थांना तपासण्यासाठी ‘या’ राज्यांमधून डॉक्टर येणार
बुलढाण्यातल्या शेगांव तालुक्यातील केस गळतीने ग्रामस्तांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. परंतू केस गळती पाण्याने किंवा फंगल इन्फेक्शनमुळे झालेली नसल्याचे उघडकीस...
मोठी बातमी! वाल्मिक कराडचा आणखी एक मोठा घोटाळा? धनंजय मुंडेंही अडचणीत
संपूर्ण बीड जिल्हाच केंद्रशासित म्हणून घोषित करा, राऊत थेट बोलले; कुणाकडे करणार मागणी
‘सलमानसोबत लग्न कर अन् क्यूट मूलांना जन्म दे’; अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ किस्सा
कंगना राणौत यांच्या ‘इमर्जन्सी’वर नितीन गडकरींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले..
‘निसा नव्हे नशा देवगण..’; अजय देवगणची लेक तुफान ट्रोल, पहा व्हिडीओ
प्रवास केल्यानंतर तुमचेही पोट होते का खराब? मग या टिप्स ठरतील फायदेशीर