प्रसिद्ध अभिनेत्रीचा उद्योगपतीवर लैंगिक शोषणाचा आरोप, आरोपीला केरळमधून अटक

प्रसिद्ध अभिनेत्रीचा उद्योगपतीवर लैंगिक शोषणाचा आरोप, आरोपीला केरळमधून अटक

फिल्म इंडस्टीत आजपर्यत अनेक अभिनेत्री कास्टिंग काऊच, लैंगिक शोषणाच्या शिकार झाल्या आहेत. काहींनी याबाबत मौन बाळगणं पसंत केलं, तर काहीनी स्त्रियांवरी लैंगिक अत्याचारावर वाचा फोडली. अशातच आता एका अभिनेत्रीने एका व्यावसायिकावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. अभिनेत्रीने या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणाची तत्काळ दखल घेत आरोपी व्यावसायिकाला अटक केली आहे.

हेमा समितीच्या अहवालातून आतापर्यंत अनेक मल्याळम चित्रपटसृष्टीतून लैंगिक शोषणाच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अशातच मल्याळम चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्राी हनी रोझ हिने एका ज्वेलरी ब्रँडचा मालक असलेल्या उद्योपपती बॉबी चमनूरवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. बॉबीने तिच्यासोबत अनेक वेळा गैरवर्तन केल्याचे तिने सांगितले. अश्लील संदेश, आक्षेपार्ह आणि अपमानास्पद कमेंट केल्याचाही दावा तिने केला आहे. हनी रोझने अनेक सोशल मीडिया पोस्टद्वारे उद्योगपती बॉबी चमनूरवर आरोप हे केले. यासंदर्भात तिने तक्रारही दाखल केली आहे.

अभिनेत्रीच्या तक्रारीवरून पोलिसांना बॉबी चमनूरला केरळमधील वायनाड येथून अटक केली. पोलीस सध्या या संदर्भात पुढील तपास करत आहेत. दरम्यान बॉबी यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांनी स्वत: वरील सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बॉबी चमनूर हे केरळचे एक मोठे उद्योगपती आणि ‘चमनूर इंटरनॅशनल ज्वेलर्स’चे मालक आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पाण्यामुळे नाही, फंगल इन्फेक्शन नाही…मग टक्कल पडतंय कसं? बुलढाण्यातील ग्रामस्थांना तपासण्यासाठी ‘या’ राज्यांमधून डॉक्टर येणार पाण्यामुळे नाही, फंगल इन्फेक्शन नाही…मग टक्कल पडतंय कसं? बुलढाण्यातील ग्रामस्थांना तपासण्यासाठी ‘या’ राज्यांमधून डॉक्टर येणार
बुलढाण्यातल्या शेगांव तालुक्यातील केस गळतीने ग्रामस्तांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. परंतू केस गळती पाण्याने किंवा फंगल इन्फेक्शनमुळे झालेली नसल्याचे उघडकीस...
मोठी बातमी! वाल्मिक कराडचा आणखी एक मोठा घोटाळा? धनंजय मुंडेंही अडचणीत
संपूर्ण बीड जिल्हाच केंद्रशासित म्हणून घोषित करा, राऊत थेट बोलले; कुणाकडे करणार मागणी
‘सलमानसोबत लग्न कर अन् क्यूट मूलांना जन्म दे’; अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ किस्सा
कंगना राणौत यांच्या ‘इमर्जन्सी’वर नितीन गडकरींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले..
‘निसा नव्हे नशा देवगण..’; अजय देवगणची लेक तुफान ट्रोल, पहा व्हिडीओ
प्रवास केल्यानंतर तुमचेही पोट होते का खराब? मग या टिप्स ठरतील फायदेशीर