200 कोटींचे विजेचे बिल… 440 व्होल्टचा करंट
हिमाचल प्रदेशातील एका व्यक्तीला 200 कोटी रुपयांचे विजेचे बिल आले. बिल बघून व्यावसायिकाला मोठा धक्का बसला. त्याची झोपच उडाली.
ही घटना हमीरपूर जिह्यात बेहडवी जट्टा गावात घडली. ललित धिमान गावात विटा बनवण्याचे काम करतात. त्यांच्या नावावर 2 अब्ज 10 कोटी 42 लाख 8 हजार 405 रुपये एवढे विजेचे बिल आले. ही रक्कम नेमकी किती आहे, हेदेखील ललित यांना समजले. या धक्क्यातून सावरल्यानंतर ते तडक वीज कार्यालयात गेले. बिलाच्या यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्याने काहीतरी गडबड झाल्याची कबुली वीज कर्मचाऱ्यांनी दिली. त्यानंतर तीन-चार तासांनी ललित यांना नवीन बिल देण्यात आले. त्यावर 4047 रुपये एवढी रक्कम होती. वीज कार्यालयाने आपली चूक मान्य केली आणि यापुढे अशी चूक होणार नाही याची खबरदारी घेऊ असे सांगून ललित यांना आश्वस्त केले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List