‘त्या वृद्धाने मला घाणेरडा स्पर्श केला’; बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितला तो भयानक किस्सा
बॉलिवूड अभिनेत्रींपासून ते सामान्य मुलींपर्यंत अनेकींना असे अनेक प्रसंग आलेले आहेत जे भयानक असतात. जसं की गर्दीच्या ठिकाणी किंवा बस, ट्रेनमध्ये चुकीच्या पद्धतीने हात लावणे वैगरे असे अनेक किस्से घडतात. असाच एक किस्सा घडला होता एका बॉलिवूड अभिनेत्रीसोबत.
या बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितल्याप्रमाणे एका वृद्ध माणसाने तिला घाणेरड्या पद्धतीने स्पर्श केल्याचा भयानक प्रसंग तिने सांगितला. ही प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री म्हणजे सयानी गुप्ता.
अभिनेत्रीचा विचित्र अनुभव
सयानी ने हा प्रसंग सांगताना म्हटलं की, “मी 7 ते 8 वर्षांची असताना बसमध्ये एका वृद्धाने मला घाणेरड्या पद्धतीने स्पर्श केला. मला आठवते की मी त्याच्या पायावर पूर्ण ताकदीने मारले होते. पायाला दुखापत झाल्यामुळे तो म्हातारा ओरडला आणि नंतर पळून गेला” हा प्रसंग सांगत सयानीने अशा प्रसंगावेळी नेमकं कसं वागावं हे देखील सयानीने सांगण्याचा प्रयत्न केला आहे. एवढचं नाही तर याच प्रसंगावरून सयानीने भारतीय पुरुषांना ‘असंस्कृत’ म्हटलं होतं.
बॉलिवूडमध्ये दमदार अभिनयासाठी सयानीची ओळख
दरम्यान सयानीला बॉलिवूडमध्ये तिच्या दमदार अभिनयासाठी ओळखलं जातं. त्याने 2012 मध्ये आपल्या करिअरला सुरुवात केली. शाहरुख खान, अक्षय कुमार, आयुष्मान खुराना यांच्यासह अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केलेल्या या अभिनेत्रीने आपल्या अभिनयामुळे बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सयानी सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. ती तिच्या बोल्ड स्टाइलमुळे आणि तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे नेहमी चर्चेत असते.
बंगाली अप्सरा म्हटले जाते
सयानीला बंगाली अप्सरा म्हणून ही ओळखलं जातं. 9 ऑक्टोबर 1985 रोजी पश्चिम बंगालमध्ये जन्मलेल्या सयानीने 2012 मध्ये ‘सेकंड मॅरेज डॉट कॉम’ या चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. कॉमेडियन कपिल शर्माच्या ‘ज्विगेटो’ चित्रपटानंतर ती ‘कॉल मी बे’मध्ये दिसली होती.
सयानी गुप्ता यांनी लहानपणापासूनच काम करायला सुरुवात केली. त्यांनी ऑडिओचे काम सुरू केले. त्यांचे बालपण बहुतेक वेळा ऑल इंडिया रेडिओच्या स्टुडिओमध्ये गेले कारण त्यांचे वडील उद्घोषक, संगीतकार आणि गायक होते.
एका मुलाखतीत तिने सांगितले की, जेव्हा ती 5 वर्षांची होती, तेव्हा तिला रेडिओ जाहिरातीत नोकरी मिळाली. या कामासाठी त्यांना 500 रुपये मिळाले. यानंतर सयानीने व्हॉइस ओव्हर असाइनमेंट घेण्यास सुरुवात केली.
#MeToo चळवळीदरम्यान आयुष्यातील अनेक प्रसंग सांगितले
सयानी तिच्या बिनधास्त बोलण्याच्या शैलीसाठी प्रसिद्ध आहे. #MeToo चळवळीदरम्यान, तिने तिच्या आयुष्यातील घडलेली घटना सांगण्याचे धाडस केले. ती घटना म्हणजे वृद्धाने तिच्यासोबत केलेले गैरवर्तन. या प्रसंगावर बोलताना सयानी हे देखील म्हणाली की, “तुमच्या सुरक्षेसाठी तम्ही आवाज उठवणे फार महत्वाचे आहे. स्त्रियांनी नेहमी चुकीचे हेतू असलेल्या लोकांपासून सावध राहिले पाहिजे.” तसेच सयानी गुप्ताने सोशल मीडियावर भारतीय पुरुषांना असभ्य संबोधणारी पोस्ट शेअर केली होती.
फ्लाइट दरम्यानचा प्रसंग सांगत संताप व्यक्त
तसेच सयानीने अजून एक प्रसंग सांगितला होता तो म्हणजे फ्लाइट दरम्यान एका व्यक्तीने त्याच्या पिशवीने तिच्या चेहऱ्यावर प्रहार करण्याचा प्रयत्न केल्याचंही म्हटलं होतं.
या सर्व प्रसंगावरून बोलताना तिने एक लांबलचक पोस्ट शेअर केली होती “फ्लाइटमध्ये भारतीय पुरुषांची वागणूक असभ्य असते. जागेकडे लक्ष न देता मोठ्याने फोन करणे, हात न लावता खोकणे, शिंकणे असे वागणे असभ्य आहे. एका माणसाने त्याच्या पिशवीने जवळजवळ माझ्या चेहऱ्यावर मारले आणि त्याला ते कळलेही नाही, तर बाकीचे सगळे माझ्याकडे फक्त बघत होते.’ असं म्हणत तिने संताप व्यक्त केला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List