मधुमेह असलेल्यांनी आवश्य खा ही पाच फळे, रक्तातील साखरेची पातळी राहील नियंत्रणात

मधुमेह असलेल्यांनी आवश्य खा ही पाच फळे, रक्तातील साखरेची पातळी राहील नियंत्रणात

मधुमेह ही आज सामान्य आरोग्य समस्या बनली आणि त्याला नियंत्रणात ठेवणे हे कुठल्याही आव्हान अपेक्षा कमी नाही. विशेषतः खाण्यापिण्याच्या बाबतीत स्वतःवर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. कारण मधुमेहामध्ये रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी कमी GI असलेले पदार्थ खावे लागतात. रक्तातील साखरेची पातळी संतुलित करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण त्याचा हृदय,मूत्र पिंड आणि इतर अवयवांवर थेट परिणाम होतो. मात्र योग्य आहार आणि जीवनशैलीचा अवलंब करून त्यावर नियंत्रण मिळवता येते. अशी काही फळे आहेत ज्यामुळे मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी ती फायदेशीर ठरतात. जाणून घेऊया अशाच फळांबद्दल जे केवळ स्वादिष्ट नाही तर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी देखील मदत करतात.

जांभूळ

जांभूळ हे मधुमेहाच्या रुग्णांसाठी वरदान मानले गेले आहे. यात कमी ग्लायसेमिक इंडेक्स आहे. ज्यामुळे ते रक्तातील साखर वेगाने वाढू देत नाही. जांभळाच्या बियांमध्ये रक्तातील साखर नियंत्रित करणारे गुणधर्म देखील असतात. जांभूळ तुम्ही डायरेक्ट खाऊ शकता किंवा त्याच्या बिया वाळवून त्याची पावडर बनवून पाण्यासोबत देखील घेऊ शकता.

सफरचंद

सफरचंद मध्ये फायबर आणि पेक्टिन नावाचे घटक असतात. जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रण ठेवण्यास मदत करतात. हे शरीरातील इन्सुलिनच्या कार्यास देखील प्रोत्साहन देते. एक मध्यम आकाराचे सफरचंद स्नॅक्स म्हणून देखील तुम्ही खाऊ शकता.

नासपती

नासपती मध्ये उच्च फायबर आणि जीवनसत्वे असतात. जे पचन मंद करून रक्तातील साखरेचे पातळी स्थिर ठेवण्यास मदत करतात. ते सॅलडमध्ये खाणे किंवा डायरेक्ट खाणे देखील फायदेशीर ठरते.

काळे द्राक्ष

काळया द्राक्षामध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात आणि त्यात नैसर्गिक साखर कमी प्रमाणात असते. रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासोबतच हृदयाच्या आरोग्यासाठी काळी द्राक्ष फायदेशीर आहेत. तुम्ही दिवसभरात कधीही दहा ते बारा काळी द्राक्ष खाऊ शकतात.

पपई

पपई हे एक असे फळ आहे ज्यामध्ये कमी कॅलरी आणि जास्त प्रमाणात फायबर असते. हे रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास मदत करते याशिवाय पचनक्रिया सुधारते. तुम्ही नाश्त्यात पपई खाऊ शकतात किंवा स्मुदी बनवून देखील खाऊ शकता.

मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी काही टिप्स

  1. संतुलित आहार घ्या: फळांचा आहारात समावेश करण्यासोबतच कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेल्या पदार्थांना आहारात प्राधान्य द्या.
  2.  नियमित व्यायाम करा: दररोज 30 मिनिटे चालणे किंवा योगासने करणे मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरते.
  3. रक्तातील साखरेची पातळी तपासत रहा: नियमित रक्तातील साखरेची पातळी तपासल्याने तुमच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यास मदत होते.
  4. भरपूर पाणी प्या: पाणी जास्त प्रमाणात पिल्यामुळे चयापचय व्यवस्थित राहते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘त्या वृद्धाने मला घाणेरडा स्पर्श केला’; बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितला तो भयानक किस्सा ‘त्या वृद्धाने मला घाणेरडा स्पर्श केला’; बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितला तो भयानक किस्सा
बॉलिवूड अभिनेत्रींपासून ते सामान्य मुलींपर्यंत अनेकींना असे अनेक प्रसंग आलेले आहेत जे भयानक असतात. जसं की गर्दीच्या ठिकाणी किंवा बस,...
‘एशियन कल्चर’ पुरस्काराने लेखक आणि गीतकार जावेद अख्तर सन्मानित
मुंबई महानगरपालिकेवर डोमकावळ्यांचं लक्ष, शिवसेना BMC निवडणूक पूर्ण ताकदीने लढणार आणि जिंकणार – विनायक राऊत
Photo – हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दादर येथील राष्ट्रीय स्मारकाचा पहिल्ला टप्पा पूर्ण
विधानसभा निवडणुकीत परळीत 201 बूथ ताब्यात घेऊन मतदान करण्यात आलं, जितेंद्र आव्हाड यांचा आरोप
Video – सहा ते आठ महिन्यात बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक पूर्णत्वास नेण्याच्या आमचा प्रयत्न असेल – आदित्य ठाकरे
आता पुरुष दिसणार अधिक स्मार्ट आणि हँडसम!