Weightloss Tips: लठ्ठपणामुळे त्रस्त आहात? जेवल्यानंतर ‘या’ गोष्टी करणं टाळा अन्यथा…
आजकालच्या बदलत्या जीवनशैलीमुळे आणि चुकिच्या खाण्या पिण्याच्या सवयींमुळे तुमच्या शरीराला योग्य पोषण मिळत नाही. शरीरामध्ये पोषणाची कमतरता झाल्यामुळे लठ्ठपणा, कोलेस्ट्रॉल, रक्तदाब आणि मधुमेह यांच्यासारख्या समस्या होतात. जंक फूजचे सेवन केल्यामुळे तुमचे वजन भरपूर प्रमाणात वाढते. जंक फूडमध्ये सॅच्युरेटेड फॅट्स असतात ज्यामुळे तुमचे वजन वाढते. याशिवाय ऑफिसमध्ये तासनतास बसून राहिल्यामुळे देखील तुमचे वजन वाढत नाही. इतकेच नाही तर आपल्या काही सवयींमुळे शरीरात चरबी वाढू लागते, ज्यामुळे लठ्ठपणा सारख्या समस्या होतात.
अनेकजण त्यांच्या आहारामध्ये जंक फूडचा समावेश करतात परंतु त्यामुळे त्यांना लठ्ठपणा आणि कोलेस्ट्रॉल सारख्या समस्या होऊ शकतात. निरोगी आरोग्यासाठी तुमच्या आहारामध्ये काही विशेष गोष्टींचा समावेश करणे गरजेचे आहे. तुमच्या आहारामध्ये फायबर, प्रोटिन आणि व्हिटॅमिन्सचा समावेश केल्यामुळे तुमचं आरोग्य निरोगी राहाते. परंतु तुमच्या दैनंदिन आयुष्यातील काही गोष्टीचां तुमच्या आरोग्यावर परिणाम दिसून येतो. विशेषत: रात्री जेवल्यानंतर काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा तुमचे वजन वाढू शकते.
आजकालच्या व्यस्त जीवनशैलीमुळे अनेकजण रात्री लेट जेवण करतात. त्यानंतर लगेच झोपण्यास जातात. परंतु या सवयीमुळे तुमच्या आरोग्याला गंभीर परिणाम होऊ शकतो. जेवल्यानंतर लगेच झोपल्यामुळे तुम्हाला पचनासंबंधीत समस्या होऊ शकतात त्यासोबतच वजन देखील वाढते. म्हणून जेवल्यानंतर अर्धा ते एक तास चाला आणि त्यानंतर दोन तासांनी झोपा. पाणी पिणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते परंतु पिण्याच्या पाण्याची वेळ खूप महत्त्वाची असते. जेवल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यास शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतात. आयुर्वेदानुसार जेवणादरम्यान आणि नंतर पाणी प्यायल्यामुळे तुमच्या पचनक्रियेमध्ये त्रास होई शकतो. याशिवाय वजन वाढण्याची देखील शक्यता असते. त्यामुळे रात्रीच्या जेवणानंतर ३० मिनिटांनी पाणी प्या.
या सवयीमुळे तुमचं वजन वाढवू शकतं
अनेकांना जेवणानंतर कॉफी पिण्याची सवय असते, परंतु या सवयीमुळे तुमचं वजन वाढवू शकतं. कॉफीमधील कॅफीनमुळे तुम्हाला झोप येत नाही, ज्यामुळे तुमचे वजन आणि आरोग्यावर परिणाम होतो. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल जेवणानंतर कॉफी पिण्याची सवय सोडून द्या. त्यासोबतच तुमच्या आहारामध्ये साखरेच्या जागी गुळाचा वापर करा यामुळे तुमचे वजन झटपट कमी होते आणि तुमचे आरोग्य निरोगी राहाण्यास देखील मदत होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List