निरोगी केसांची काळजी घेताना ‘या’ चुका टाळा अन्यथा.., होतील गंभीर परिणाम

निरोगी केसांची काळजी घेताना ‘या’ चुका टाळा अन्यथा.., होतील गंभीर परिणाम

अनेकांनां लांब आणि घणदाट केस पाहिजेल असतात. परंतु आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे केसांची काळजी घेणे महत्त्वाचे असते. केसांची योग्य काळजी नाही घेतल्यामुळे अनेक समस्या होऊ शकतात. केसांची काळजी घेताना काही चुका केल्यामुळे तुम्हाला केसगळती, कोंडा अशा समस्या होतात. केसांना निरोगी ठेवण्यासाठी त्यांची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. निरोगी केसांसाठी आठवड्यातून दोन ते तीन वेळा केसांना तेल लावणे अत्यंत गरजेचे असते. केसांना तेर लावल्यामुळे केसांमध्ये जटा होत नाहीत. केसांना तेल लावल्यामुळे केसांवर नैसर्गिक चमक येते आणि केसगळतीची समस्या दूर होण्यास मदत होते.

वातावरणातील प्रदुषणामुळे केस फ्रिझी आणि ड्राय होऊ लागतात. त्यामुळे केसांची निगा राखणे गरजेचे असते. आठवड्यातून दोन ते तीन वेळा केस धुणे गरजेचे असते. केसांना धुतल्यामुळे त्यांच्यातील धुळ आणि प्रदुषण काढून टाकण्यास मदत होते. केस ड्राय करताना हेआर ड्रायरचा वापर केल्यामुळे केसगळण्याच्या समस्या अधिक वाढतात. चला तर जाणून घेऊया निरोगी केसांसाठी केसांची काळजी कोणत्या पद्धतीनं घ्यावी.

केस धुतल्यानंतर अनेकांना केस विंचरण्याची सवय असते. पंरतु केस घुतल्यावर लगेच विंचरल्यामुळे तुम्हाला अनेक समस्या होऊ शकतात. केस धुतल्यानंतर कमकुवत होतात. अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही ओल्या केसांना विंचरल्यामुळे तुमचे केसस तुटतात ज्यामुळे केसगळतीची समस्या वाढण्यास सुरुवात होते. अनेकजण दररोज केस धुतात परंतु जास्त प्रमाणात केस धुतल्यामुळे ते अधिक कमकुवत होतात आणि केसगळतीची समस्या वाढते. त्यासोबतच केसांमधील नैसर्गिक तेल निघून जाते आणि केस अधिक फ्रिझी आणि ड्रास होऊ लागतात. त्यामुळे जस्त वेळा हेअर वॉश करू नये. हिवाळ्यामध्ये अनेकजण गरम पाण्याने अंगोळ करतात. परंतु गरम पाण्याने केस धुतल्यामुळे तुमच्या स्कॅल्पवर त्यांचा गंभार परिणाम होऊ शकतो. हिवाळ्यात गरम पाण्याने केस धुतल्यामुळे केसगळतीची समस्या वढते. त्यामुळे गरम पाण्याने हेअर वॉश करू नये.

आजकर केस सरळ आणि कर्ल्स करण्यासाठी हीटिंग टूल्सचा वापर केला जातो. परंतु, स्ट्रेटनर, कर्लर आणि ब्लो ड्रायरसारख्या हीटिंग टूल्सचा वापर केल्यामुळे तुमची केस कमकुवत आणि ड्राय होतात. यांच्या वापरामुळे केसगळतीची समस्या वाढते. अनेकजण तेल लावल्यनंतर केस घट्ट बांधतात. केसांना तेल लावल्यावर ते कमकवत होतात आणि घट्ट घट्ट बांधल्यामुळे केसगळतीची समस्या वाढते. लांब केसांच्या निरोगी आरोग्यासाठी योग्य आणि पोषक आहाराचे सेवन करणे गरजेचे आहे. निरोगी केसांसाठी तुमच्या आहारामध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजांचा समावेश करा. योग्य आणि पोषक आहारामुळे तुम्हाला केसगळतीच्या समस्या होत नाहीत.

निरोगी केसांसाठी ‘या’ टिप्स वापरा :

केसांना नियमित खोबरेल तलानी मसाज करा.

आठवड्यातून दोन वेळा केस स्वच्छ धुवा.

एक ते दोन महिन्यांच्या गॅपने केस ट्रिम करा.

केसांना कोणत्याही प्रकारचे रासायनिक शॅम्पू लावू नका.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘त्या वृद्धाने मला घाणेरडा स्पर्श केला’; बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितला तो भयानक किस्सा ‘त्या वृद्धाने मला घाणेरडा स्पर्श केला’; बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितला तो भयानक किस्सा
बॉलिवूड अभिनेत्रींपासून ते सामान्य मुलींपर्यंत अनेकींना असे अनेक प्रसंग आलेले आहेत जे भयानक असतात. जसं की गर्दीच्या ठिकाणी किंवा बस,...
‘एशियन कल्चर’ पुरस्काराने लेखक आणि गीतकार जावेद अख्तर सन्मानित
मुंबई महानगरपालिकेवर डोमकावळ्यांचं लक्ष, शिवसेना BMC निवडणूक पूर्ण ताकदीने लढणार आणि जिंकणार – विनायक राऊत
Photo – हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दादर येथील राष्ट्रीय स्मारकाचा पहिल्ला टप्पा पूर्ण
विधानसभा निवडणुकीत परळीत 201 बूथ ताब्यात घेऊन मतदान करण्यात आलं, जितेंद्र आव्हाड यांचा आरोप
Video – सहा ते आठ महिन्यात बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक पूर्णत्वास नेण्याच्या आमचा प्रयत्न असेल – आदित्य ठाकरे
आता पुरुष दिसणार अधिक स्मार्ट आणि हँडसम!