“क्या इसे अल्लाह हू अकबर कहते हुए काटा…?” सना खानचा हॉटेलमधला व्हिडीओ व्हायरल

“क्या इसे अल्लाह हू अकबर कहते हुए काटा…?” सना खानचा हॉटेलमधला व्हिडीओ व्हायरल

अभिनेत्री सना खानने चित्रपटसृष्टीला अलविदा म्हटल्यानंतरचेही अनेक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. एकेकाळी कन्नड चित्रपट ‘कूल’सह अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये मिनी स्कर्ट आणि बिकिनी परिधान केलेल्या सना खानने चार वर्षांपूर्वी चित्रपटसृष्टीला अलविदा केला होता.

पूर्णपणे इस्लाम धर्म स्वीकारलेली सना आता दोन मुलांची आई आहे आणि ती सुखी कौटुंबिक जीवन जगत आहे. तिचे लग्न गुजरातमधील अंकलेश्वर येथील मुफ्ती अनस सय्यद यांच्याशी झाले आहे. लग्नाच्या निर्णयामुळे त्यांनी चित्रपट सोडण्याचा निर्णय घेतला होता.

सनाने नुकतेच दुसऱ्या मुलालाही जन्म दिला आहे. तिने 12 मुले होण्याची इच्छाही व्यक्त केली होती. आता तिच्या दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर तिचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एका हॉटेलमधला असून ती जेवणाबद्दल तेथील कर्मचाऱ्यांशी बोलताना दिसत आहे.

सना खानचा हॉटेलमधला  व्हिडीओ व्हायरल

या व्हिडिओमध्ये सना त्या हॉटेलमध्ये शुद्ध हलाल मांसासाठी तेथील कर्मचाऱ्यांशी बोलताना दिसत आहे. ती तेथील कर्मचाऱ्यांना विचारताना दिसतेय की, ” हे हलाल अन्न आहे का? त्यावर कर्मचारी होय उत्तर देतात. मग सना विचारते, “अल्ला हु अकबर म्हणत हे कापलं गेलं होतं का? कारण काही लोक ते तसंच कापतात, ते हलाल होत नाही. त्यामुळे मला भीती वाटते. म्हणूनच मी शाकाहारी पदार्थ खाते. असं म्हणत ती ते मांस नक्की हलालच आहे का याची खात्री करताना दिसत आहे.

दरम्यान सनाच्या या व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. नेटकऱ्यांनी अनेक नकारात्मक कमेंट दिल्याचं दिसून येत आहे. या व्हिडीओमुळे सनाला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pratahkal Live (@pratahkal.live)

बिकिनीमुळे प्रसिद्ध झालेल्या सनाचा हिजाब घालण्याचा निर्णय…

बिकिनीमुळे प्रसिद्ध झालेल्या सनाने जेव्हा हिजाब घालण्याचा निर्णय घेतला तेव्हा तिने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली. तिने लिहिले होते, ‘माझ्या जुन्या आयुष्यात माझ्याकडे सर्वकाही होते. पैसा, नाव, प्रसिद्धी, सर्व काही. मला पाहिजे ते मी करू शकत होते. पण एक गोष्ट हरवली होती, ती म्हणजे माझ्या मनातील शांती. माझ्याकडे सर्व काही होते, पण आनंद नव्हता. ते दिवस खूप कठीण आणि निराशाजनक होते. माझ्याकडे सर्व काही होते, पण आनंद नव्हते.” असं म्हणत देवाच्या संदेशानंतर तिने अभिनय सोडून हिजाब घालण्याचा निर्णय घेतल्याचं सनाने सांगितले.

रमजानमध्ये पडलेल्या स्वप्नामुळे बदललं आयुष्य

सनाने बॉलिवूडशिवाय तमिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्येही काम केले आहे. अनेक चित्रपटाच्या यशानंतरही तिने चित्रपटांना अलविदा केलं. रमजान 2019 मध्ये तिला एक स्वप्न पडल्याचं तिने सांगितले होते. तिने स्वप्न सांगताना म्हटलं “मी एका जळत्या कबरीकडे पाहत होते. मी थडग्यात स्वतःकडे पाहत होते. मी एक रिकामी कबर पाहिली, मी स्वतःला तिथे पाहिले. मला वाटले की जर मी बदलले नाही तर हा माझा अंत असेल. हे देवाने दिलेले संकेत होते. यामुळे मला विचार आले आणि मी हिजाब घालण्याचा निर्णय घेतला.” असं सनाने सांगतलं.

 

 

 

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘राजकारणात उद्या काय होईल ते सांगता येईल का?’; उद्धव ठाकरे यांचं सूचक वक्तव्य?  ‘राजकारणात उद्या काय होईल ते सांगता येईल का?’; उद्धव ठाकरे यांचं सूचक वक्तव्य? 
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं कामकाज कुठपर्यंत झालं हे पाहण्यासाठी...
शिवसेनाप्रमुखांनी आत्मचरित्र का लिहिले नाही…उद्धव ठाकरे यांनी दिले उत्तर
गौरी खानचं खरं नाव माहितीये का? गौरीनेलग्नावेळी शाहरूखचंही बदललं होतं नाव
वामिका-अकायसोबत विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या दर्शनाला; मागितली ‘ही’ गोष्ट
कोल्ड ड्रिंक्स प्यायल्याने कॅन्सर होतो का? जाणून घ्या
पाकला घेरलं; तालिबानचा सैन्याच्या चौक्यांवर हल्ला, अणु प्रकल्पातील 16 कामगारांचं अपहरण
मराठमोळ्या सायलीचे पदार्पण आणि टीम इंडियाची विजयी सुरुवात, आयर्लंडचा केला 6 विकेटने पराभव