“आम्ही एकमेकांना शिव्या-शाप देतच असतो..”; गोविंदाच्या पत्नीकडून खुलासा
अभिनेता गोविंदाने 1987 मध्ये सुनिताशी लग्न केलं. त्यावेळी गोविंदा 24 वर्षांचा आणि सुनिता 18 वर्षांची होती. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सुनिता गोविंदासोबतच्या नात्याबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली. आमचं नातं सर्वसामान्य जोडप्यांपेक्षा थोडं वेगळं असून आम्ही थेट एकमेकांच्या तोंडासमोर जे आहे ते बोलतो, असं सुनिता म्हणाली. या मुलाखतीत सुनिताला विचारण्यात आलं की, जेव्हा गोविंदा इतर अभिनेत्रींसोबत काम करतो, ऑनस्क्रीन रोमान्स करतो.. तेव्हा तिला काय वाटतं? यावर सुनिताने स्पष्ट सांगितलं की, आमचं नातं हे सर्वसामान्य पती-पत्नीच्या नात्यासारखं नाही.
सुनिता याविषयी पुढे म्हणाली, “मला आजपर्यंत असं कधी जाणवलं नाही की आम्ही पती-पत्नी आहोत. आमच्या शिव्या-शाप चालूच असतात. मी तर अनेकदा गोविंदाला मस्करीत म्हणते की, मला आजपर्यंत विश्वास होत नाही की तू माझा पती आहेस.” गोविंदा आणि सुनिता यांना यशवर्धन हा मुलगा आणि टिना ही मुलगा आहे. एका मुलाखतीत गोविंदाने सुनितासोबतच्या डेटिंग लाइफबद्दल सांगितलं होतं, “ती खूप मॉडर्न होती. तिला डेट करताना मलाच भीती वाटायची की कोणी काही बोलेल. इतकी ती लहान होती. आम्ही दोघं त्यावेळी खूप तरुण होतो. ”
आणखी एका मुलाखतीत गोविंदाने खुद्द पत्नी सुनितासमोर कबुली दिली होती की, जर ती नसती तर त्याने नक्कीच अभिनेत्री माधुरी दीक्षितसोबत फ्लर्ट केलं असतं. याच मुलाखतीत गोविंदासोबत सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीची जोडी कोणती असती, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर सुनिताने लगेच माधुरीचं नाव घेतलं होतं. “गोविंदाला माधुरी दीक्षित खूप आवडते”, असं ती म्हणाली होती. त्यावर गोविंदा पुढे सांगतो, “मला रेखाजीसुद्धा खूप आवडतात. आजपर्यंत माधुरी आणि रेखा यांनी इंडस्ट्रीत कोणतीच कॉन्ट्रोवर्सी निर्माण केली नाही. जी व्यक्ती आतून सुंदर असते, ती बाहेरूनही कधीच आपलं सौंदर्य गमावत नाही. या दोघी अभिनेत्री तशाच आहेत. जर माझ्या आयुष्यात सुनिता नसती तर मी नक्कीच माधुरीसोबत फ्लर्ट केलं असतं.”
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List