मुलाचा रंग गोरा तर मुलगी सावळी..; वर्णभेदावर ट्विंकल खन्नाचं सडेतोड उत्तर

मुलाचा रंग गोरा तर मुलगी सावळी..; वर्णभेदावर ट्विंकल खन्नाचं सडेतोड उत्तर

1990 च्या दशकात ट्विंकल खन्ना ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक होती. लग्नानंतर तिने चित्रपटांमध्ये फारसं काम केलं नाही. ती लिखाणाकडे वळली. ट्विंकल आणि अक्षय कुमार यांना आरव हा मुलगा आणि नितारा ही मुलगी आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ट्विंकलने सांगितलं की तिच्या दोन्ही मुलांच्या स्कीन टोनवरून (वर्ण/रंग) अनेकदा भेदभाव होतो. मात्र आपण जसं आहोत तसं स्वत:ला स्विकारावं हे त्यांना शिकवण्याचा निश्चय तिने केला आहे. या मुलाखतीत ट्विंकलने तिच्या मुलीचा एक किस्सासुद्धा सांगितला आहे.

“माझ्या पहिल्या बाळासोबत मीसुद्धा बऱ्याच गोष्टी शिकले आणि माझ्या मते तुमचं बाळ हे जणू तुमच्यासाठी एकाप्रकारचं मॅन्युअलच असतं. तुम्हीसुद्धा बाळासोबत नवनवे प्रयोग करू पाहता. पण जेव्हा मला दुसरं बाळं झालं, तेव्हा मला अनेकदा त्या दोघांमध्ये तुलना झाल्याचं पहायला मिळालं. माझी मुलगी नितारा ही सर्वसामान्य भारतीय मुलीसारखी दिसते. पण तिच्या भावाचा वर्ण आणि दिसणं यावरून नेहमी तिची तुलना केली जाते. हा वर्णभेद आपल्या देशात खूप आधीपासूनच आहे. त्यामुळे मी ठरवलं की मी माझ्या मुलीने अशा पद्धतीने शिकवेन, जेणेकरून तिच्यातील आत्मविश्वास वाढेल आणि तिला स्वत:विषयी नेहमीच खूप चांगलं वाटेल. उदाहरण द्यायचं झाल्यास, तिच्या भुवया जोडलेल्या आहेत. त्यावरून मी तिला म्हणाले की तू फ्रिडा काहलोसारखी सुंदर दिसते. तिच्यासारखीच तू सुद्धा विस्मयकारक आहेत. तिचा वर्ण सावळा आहे, तर ती तिला सांगते की तिची त्वचा सोनेरी रंगाची आहे”, असं ट्विंकल म्हणाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Twinkle Khanna (@twinklerkhanna)

या सगळ्या गोष्टींचा परिणाम काय झाला, याविषयी सांगताना ती पुढे म्हणाली, “एकेदिवशी नितारा तिच्या भावासोबत समुद्रकिनारी जात होती. त्यावेळी तिने सनस्क्रीन किंवा सनब्लॉक लावण्यास नकार दिला. मला त्याची गरज नाही, कारण माझी त्वचा तुझ्यापेक्षा चांगली आहे, असं ती म्हणाली. त्यानंतर तिने एका ब्राऊन टी-शर्टची तुलना स्वत:शी आणि पांढऱ्या टी-शर्टची तुलना भावाशी केली. पांढरा टी-शर्ट लवकर खराब होतो, पण ब्राऊन लवकर मळत नाही, असं ती म्हणाली. हे ऐकून मला एकप्रकारे माझा विजय झाल्यासारखं वाटलं होतं.”

ट्विंकलने 2002 मध्ये आरवला जन्म दिला. त्यानंतर 2012 निताराचा जन्म दिला. आरव आणि नितारा यांच्या वयात दहा वर्षांचं अंतर आहे. आरवच्या दिसण्याचं अनेकदा नेटकऱ्यांकडून कौतुक होतं. तर निताराचा चेहरा ट्विंकल आणि अक्षयने बरीच वर्षे सोशल मीडियावर दाखवलं नव्हतं. अनेकदा ते तिचे पाठमोरे किंवा ज्यात तिचा चेहरा दिसणार नाही असेच फोटोच पोस्ट करायचे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘या’ स्वस्त कार्समध्ये मिळतात 6 एअरबॅग्स, किंमत 5.92 लाख रुपयांपासून सुरू, सेफ्टीत आहे बेस्ट ‘या’ स्वस्त कार्समध्ये मिळतात 6 एअरबॅग्स, किंमत 5.92 लाख रुपयांपासून सुरू, सेफ्टीत आहे बेस्ट
अलीकडेच अनेक लोक नवीन कार खरेदी करताना कारच्या सेफ्टी फीचर्सकडे अधिक लक्ष देताना दिसतात. ग्राहकांना पूर्णपणे सुरक्षित कार हवी आहे....
Automobile Year Ender: ‘या’ आहेत 2024 मध्ये लॉन्च झालेल्या टॉप 10 कार्स, पाहा लिस्ट
अभिनेत्री प्राजक्ता माळी सुरेश धस यांच्याविरोधात महिला आयोगात तक्रार करणार, सूत्रांची माहिती
अर्जून कपूर म्हणाला मी सिंगल, त्यावर मलायकानं दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाली…
रेणापूरमध्ये धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, बावनकुळेंची पहिली प्रतिक्रिया समोर
राजघाटाऐवजी निघमबोध घाटावर डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर अंत्यसंस्कार, काँग्रेसचा आक्षेप
ज्युनिअर एनटीआरचा ‘देवरा’ चित्रपट जपानमध्ये प्रदर्शित होणार, तारीखही ठरली