कवठे येमाईत अष्टविनायक महामार्गावर भीषण अपघात; तरुणाचा जागीच मृत्यू
शिरूरच्या पश्चिम भागातून जाणारा अष्टविनायक महामार्ग मृत्यूचा सापळा बनत आहे. काही दिवसांपूर्वीच कवठे येमाईच्या इचकेवाडीजवळ झालेल्या अपघात दोघांचा मृत्यू झाला होता, तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना नुकतीच घडली होती. मंगळवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास दुचाकी व चारचाकीच्या झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.
आदिनाथ गोपाळ जाधव ( 25, रा.पिंपरखेड ता.शिरूर) हा रांजणगाव गणपती येथील मेडिकल दुकान बंद करून दुचाकीने पिंपरखेड येथे जात होता. रात्री 8 वाजण्याच्या सुमारास अष्टविनायक महामार्गावर कवठे येमाई येथील हिलाळ (फासे वस्ती) नजीक याच रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या झालेल्या धडकेत त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. धोकादायक ठरणाऱ्या या महामार्गावर तात्काळ गतिरोधक बसविण्याची मागणी स्थानिक आणि प्रवाशांतून होत आहे.या अपघाताचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अनिल आगलावे हे करीत आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List