Kalyan News – महापालिकेच्या कचरा गाडीच्या धडकेत आई आणि चिमुरडा जागीच ठार
कल्याणमध्ये महापालिकेच्या भरधाव कचरा गाडीने एका महिलेला व तिच्या मुलाला जोरदार धडक दिली. या धडकेत आई व मुलाचा दोघांचाही चिरडून मृत्यू झाला आहे. निशा सोमेसकर (37) आणि अंश सोमेसकर (3) असे त्या आई मुलाचे नाव आहे.
निशा या बुधवारी सकाळी त्यांच्या मुलाला घेऊन लालचौकी भागातून चालल्या होत्या. त्यावेळी केडीएमसीचा कचऱ्याचा ट्रक भरधाव वेगाने त्यांच्या दिशेने आला व त्यांना उडवले. या अपघातात दोघेही ट्रकच्या टायरखाली चिरडले गेले. दोघांना तातडीने पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात नेण्यात आले मात्र त्या आधीच त्यांचा मृत्यू झाला होता.
अपघाताची माहिती मिळताच बाजारपेठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List