वाल्मीक कराडला पोलीस स्टेशनमध्ये VIP ट्रीटमेंट मिळतेय – संदीप क्षीरसागर
बीड जिह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्याकांडाशी संबंधित खंडणीप्रकरणी आरोपी वाल्मीक कराड तुरुंगात आहे. मात्र तुरुंगात त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी केला आहे. ‘एबीपी माझा’अशी संवाद साधताना संदीप क्षीरसागर यांनी हा आरोप केला आहे.
काय म्हणाले संदीप क्षीरसागर?
संदीप क्षीरसागर म्हणाले की, संतोष देशमुख यांच्या हत्याशी संबंधित तपासात वाल्मीकी कराडचा जेव्हा विषय येतो, तेव्हा तिथे कुठे तरी हे प्रकरण थांबल्यासारखं दिसत आहे. इतर आरोपी ज्यांना अटक करण्यात आली आहे, त्यातील एक फरार आहे. हे सुपारी घेऊन काम करणारे लोक आहेत. मात्र यामधील मास्टरमाइंड हा वाल्मीकी कराड आहे. त्याला अजूनही 302 मध्ये का आरोपी करण्यात आलं नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
क्षीरसागर म्हणाले, ”सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर पोलिसांनी एफआयआर नोंदवून घेण्यासाठी 12 तासांचा वेळ घेतला, या मागे काय कारण होतं? त्या काळात पोलीस ठाण्यात जे पोलीस अधिकारी होते, त्यांना कोणी फोन करून दबाव टाकला का? याचं उत्तर मिळालं पाहिजे.”
वाल्मीक कराडबद्दल बोलताना संदीप क्षीरसागर म्हणाले की, ”एखाद्या गुन्हेगाराला अटक झाल्यानंतर त्याच्या अंगावर असलेले दोरे किंवा इतर गोष्टी काढून लॉकरमध्ये ठेवायला सांगतात. मात्र आताही त्याला पाहिलं तर त्याच्या हातातले दोरे किंवा इतर गोष्टी या जशाच्या तशा आहेत. याला व्हीआरपी ट्रीटमेंटच म्हणावं लागेल.”
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List