अजित पवार गटाकडून राष्ट्रवादीचे खासदार फोडण्याचा प्रयत्न का होतोय? संजय राऊत यांनी सांगितलं पडद्यामागचं राजकारण

अजित पवार गटाकडून राष्ट्रवादीचे खासदार फोडण्याचा प्रयत्न का होतोय? संजय राऊत यांनी सांगितलं पडद्यामागचं राजकारण

अजित पवार गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सात खासदार फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या खासदारांशी संपर्कही साधला होता. राज्यातील सत्तेत सहभागी असताना आणि विधानसभेत यश मिळूनही अजित पवार गटाकडून राष्ट्रवादीचे खासदार फोडण्याचा प्रयत्न का होतोय? यामागील कारण शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी बुधवारी माध्यमांशी बोलताना सांगितले.

संजय राऊत म्हणाले की, जोपर्यंत खासदार फुटत नाही तोपर्यंत अजित पवार गटाला केंद्रामध्ये मंत्रीपद मिळणार नाही. प्रफुल्ल पटेल यांना हे मंत्रीपद हवे असून केंद्रात मंत्रीपदाचा जो कोटा आहे तो पूर्ण करण्यास त्यांना सांगितले आहे. यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सहा ते सात खासदार फोडा आणि मंत्रीपद मिळवा, अशी ऑफर देण्यात आली आहे. म्हणूनच खासदार फोडण्याचे कसोशीने प्रयत्न सुरू आहेत. पण हा निर्लज्जपणा असून ईव्हीएमच्या माध्यमातून विधानसभा जिंकूनही फोडाफोडी सुरू असेल तर या देशाचे भाग्य तुम्ही काळ्याकुट्ट शाईने लिहित आहात.

भाजपकडून लोकशाही ‘हायजॅक’, निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या ताटाखालचं मांजर; संजय राऊत यांचा घणाघात

आज त्यांच्याकडे सत्ता असून दिल्लीमध्ये राक्षस बसलेले आहेत. त्यांच्याकडे ईडी, सीबीआय, पैसा आहे. त्या भीतीपोटी ही फोडाफोडी सुरू आहे. पण त्या आमदार, खासदारांचे भविष्य काय? त्यांना काय मिळणार आहे? त्यांच्या तोंडावर चघळायला हाडकेच पडणार असून आमदार, खासदारांना फोडण्याच्या प्रयत्नामुळे मोदी, शहा, फडणवीस यांचा मुखवटा गळून पडत आहे. मरेपर्यंत हेच करणार का? तुमच्याही राजकीय तिरड्या उचलल्या जाणार असून तेव्हा काय करणार? असा सवाल करत देशाची, लोकशाहीची वाट लावणारे लोक म्हणून तुमचा इतिहास लिहिला जाईल, असा हल्लाबोलही राऊत यांनी केला.

अजित पवार गटाला भाजपची लागण, राष्ट्रवादीचे 7 खासदार फोडण्याचा प्रयत्न

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

दाभाडे कुटुंबाची इरसाल गोष्ट; खळखळून हसवणाऱ्या ‘फसक्लास दाभाडे’चा धमाकेदार ट्रेलर दाभाडे कुटुंबाची इरसाल गोष्ट; खळखळून हसवणाऱ्या ‘फसक्लास दाभाडे’चा धमाकेदार ट्रेलर
टी-सीरीज, कलर यल्लो प्रॉडक्शन आणि चलचित्र मंडळी यांच्या बहुप्रतीक्षित चित्रपट ‘फसक्लास दाभाडे’ या चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे....
हंसिका मोटवानीच्या वहिनीने सासू, नणंद अन् पतीविरोधात दाखल केला FIR; नेमकं काय आहे प्रकरण?
उदित नारायण यांच्या इमारतीला आग, एकाने गमावले प्राण; घटनेचा व्हिडीओ व्हायरल
पुनर्वसनात पती-पत्नीला दोन घरे मिळणार नाहीत, हायकोर्टाचा निर्वाळा; स्वतंत्र झोपडीचा दावा फेटाळला
मुंबईत घर मिळण्याची गिरणी कामगारांची आशा पल्लवित, वरळीतील पाच एकरचा भूखंड महापालिकेकडेच राहणार
फेसबुकमधील थर्ड पार्टी फॅक्ट चेकिंग प्रोग्राम बंद; मेटाचे सर्वेसर्वा मार्क झुकरबर्ग यांची मोठी घोषणा
दिवसा इमारतीची रेकी, रात्री चोऱ्या; चोरट्य़ाने फोडले अनिवासी हिंदुस्थानी नागरिकाचे घर