अभिनेता अजित कुमारचा दुबईत भीषण अपघात; कारचा चक्काचूर, व्हिडीओ व्हायरल
दाक्षिणात्य अभिनेता अजित कुमार याचा रेसिंग करताना भीषण अपघात झाला आहे. दुबईत होणाऱ्या 24 तासांच्या (24H दुबई 2025) या शर्यतीत त्याने सहभाग घेतला होता. या दरम्यान रेसिंग सर्किटमध्ये सराव करताना त्याच्या कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात त्याच्या रेसिंग कारचा चक्काचूर झाला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अजित कुमार 24H दुबई 2025 कार रेसिंगमध्ये भाग घेण्यासाठी तयारी करत होते. सरावादरम्यान कार 180 च्या स्पीडवर होती. यावेळी त्याचं कारवरचं नियंत्रण सुटलं आणि कार बॅरिकेटला धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की, यामध्ये कारचा चूरा झाला आहे. दरम्यान या भीषण अपघातात अजित थोडक्यात बचावले असल्याचे त्यांच्या टीमने सांगितले आहे.
Ajith Kumar’s massive crash in practise, but he walks away unscathed.
Another day in the office … that’s racing!#ajithkumarracing #ajithkumar pic.twitter.com/dH5rQb18z0— Ajithkumar Racing (@Akracingoffl) January 7, 2025
मिळालेल्या माहितीनुसार, दुबईत होणारी 24H दुबई 2025 कार रेसिंग शर्यत 11 ते 12 जानेवारी दरम्यान होणार आहे. या रेसिंगसाठी अभिनेता अजित कुमार आणि त्यांची स्वतःची रेसिंग टीम सध्या दुबईत आहे. या शर्यतीसाठी अभिनेता आणि त्यांचे सहकारी मैथ्यू डेट्री, फैबियन डफीक्स आणि कैमरन मैकलियोड यांच्यासोबत सराव करत आहे.
अजितने सप्टेंबर 2024 मध्ये त्याची स्वत: ची रेसिंग टीम लॉन्च केली. याआधी त्यांनी फॉर्म्युला BMW एशिया, ब्रिटिश फॉर्म्युला 3 आणि FIA F2 चॅम्पियनशिपमध्येही भाग घेतला आहे. अजितला कार रेसिंगसोबतच बाईक रेसिंगचीही आवड आहे. 90 च्या दशकात नॅशनल मोटरसायकल रेसिंग चॅम्पियनशिपने त्यांनी रेसिंगला सुरुवात केली होती.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List