ठाकरे गटाला मोठा हादरा, आणखी एक बडा नेता सोडून चालला

ठाकरे गटाला मोठा हादरा, आणखी एक बडा नेता सोडून चालला

विधानसभा निवडणूकांत झालेल्या मानहाणीकारक पराभवातून उद्धव ठाकरे यांचा पक्ष बाहेर पडायचं नावच घेत नसल्याचे उघड झाले आहे. ठाकरे गटाचे एकामागून एक मोहरे पक्षाला सोडचिट्टी देत आहेत. ठाकरे गटातील कोकणचे नेते राजन साळवी हे सध्या ठाकरे गटात अस्वस्थ असताना आता आणखी एक बडा नेता ठाकरे गटाला सोडून चालला आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या मागे लागलेले शुक्लकाष्ठ संपण्याचे नावच घेत नसल्याचे उघड झाले आहे. कोणता नेता ठाकरे गटाला सोडून चालला आहे ते पाहूयात….

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे नेते उध्दव ठाकरे यांच्या पक्षाला लागलेली गळती थांबायचे काही नावच घेत नसल्याचे उघड झाले आहे. काल कोकणचे नेते राजन साळवी आणि उद्धव ठाकरे यांच्यात मातोश्री येथे खंडाजंगी झाल्याची चर्चा असताना आता ठाकरे गटाचा बडा नेता ठाकरे यांना सोडचिट्टी देत आहे. ठाकरे गटाचे धुळे जिल्ह्याचे सह संपर्क प्रमुख हिलाल माळी यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेच्या अनेक आंदोलनात हिलाल माळी सहभागी होते. त्यांनी असा निर्णय घेतल्याने ठाकरे गटाला धुळ्यात मोठा हादरा बसल्याचे म्हटले जात आहे.

धुळे जिल्ह्यात ठाकरे गटाला हादरा

ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख हिलाल माळी हे ठाण्याच्या दिशेने रवाना झाले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हिलाल माळी यांचा ठाण्यात शिवसेनेत प्रवेश होत आहे. हिलाल माळी यांचे धुळे शहर आणि ग्रामीण मतदारसंघांमध्ये मोठं काम आहे. शिवसेनेच्या अनेक मोठ्या आंदोलनात हिलाल माळी यांचा सहभाग होता. हिलाल माळी यांच्या शिवसेनेतील प्रवेशामुळे एकनाथ शिंदे यांना धुळे ग्रामीणमध्ये मिळेल मोठं बळ मिळणार आहे. हिलाल माळी यांच्या शिवसेनेतील प्रवेशामुळे ठाकरे यांच्या गटाला धुळे जिल्ह्यात मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. हिलाल माळी यांना धुळे ग्रामीणमध्ये उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. हिलाल माळी यांच्यासह जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य, माजी नगरसेवक, शहरातील विविध समित्यांवर असलेले कार्यकर्ते ठाकरे गटाला सोडून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

तंबाखूप्रमाणेच लठ्ठपणामुळेही कॅन्सर होतो? डॉक्टरांकडून जाणून घ्या तंबाखूप्रमाणेच लठ्ठपणामुळेही कॅन्सर होतो? डॉक्टरांकडून जाणून घ्या
    लठ्ठपणा ही भारतातील एक सामान्य समस्या आहे. पोटाची चरबी वाढल्याने आज विविध प्रकारचे आजार वाढत आहेत. ही समस्या कमी
हिवाळ्यात त्वचा निरोगी कशी ठेवावी? डॉक्टरांकडून जाणून घ्या
मानसिक ताणावासाठी ‘हे’ डिव्हाईस वापरा, वेळीच उपचार मिळणे सोपे होईल
फक्त 8,990 रुपयांमध्ये 32 इंच Smart TV खरेदी करण्याची संधी, जाणून घ्या 3 जबरदस्त ऑफर
Kho Kho World Cup 2025 – हिंदुस्थानी महिलांनी दक्षिण आफ्रिकेचा पाडला फडशा, फायनलमध्ये केला प्रवेश
Suzuki ने लॉन्च केली पहिली इलेक्ट्रिकल स्कूटर, जाणून घ्या किंमत आणि रेंज
धनंजय मुंडे यांचे दोर कापले… पालकमंत्र्यांच्या अख्खा यादीतच नाव नाही, अजितदादांच्या एन्ट्रीने बीडमध्ये साफसफाई होणार?