Mumbai News : मुंबईकरांची महागड्या वाहनांना पसंती; फेरारी, लेम्बोर्गिनीपासून ते ऑडीची खरेदी, 1400 वाहनांची नोंदणी

Mumbai News : मुंबईकरांची महागड्या वाहनांना पसंती; फेरारी, लेम्बोर्गिनीपासून ते ऑडीची खरेदी, 1400 वाहनांची नोंदणी

सरत्या वर्षात मुंबईकरांनी महागड्या कारच्या खरेदीचा सपाटा लावला. मुंबईत सरत्या वर्षात मुंबईकरांनी महागड्या कारचा विक्रम नोंदवला. 10-20 नव्हे तर 1400 महागडी वाहने नोंदवण्यात आली. फेरारी, लेम्बोर्गिनीपासून ते ऑडीची खरेदी करण्यात आली. मागच्या वर्षभरात मुंबईकरांची महागडी वाहने खरेदी करण्यास पसंती दिली. या मायानगरीत महागड्या कारमुळे शासनाला महसूल सुद्धा मिळाला.

कोरोनाचे मळभ सरातच खरेदीचा विक्रम

मुंबईकरांनी गेल्यावर्षी महागड्या कारला पसंती दिली. जानेवारी ते डिसेंबर 2024 या दरम्यान मायानगरीत 1353 महागड्या आणि आलिशान कारची खरेदी करण्यात आली. या वाहनांची किंमत एक कोटीहून अधिक आहे. मुंबईत ताडदेव आरटीओ मध्ये सर्वाधिक वाहनांची नोंदणी करण्यात आली आहे. बीएमडब्ल्यूने महागड्या गाड्यांमध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे. कोरोना काळात दोन वर्षे नागरिकांची आर्थिक आवक थांबली होती. त्यानंतर गेल्या दोन वर्षात नागरिकांची आर्थिक गाडी हळूहळू रुळावर आल्यानंतर गेल्या काही दिवसात महागड्या गाड्या आयात करण्याचे प्रमाण वाढले आहे.

या कारला सर्वाधिक पसंती

मुंबई करानी गेल्या वर्षभरात महागड्या 1400 गाड्या खरेदी केल्या आहेत. फेरारी, लेम्बोर्गिनी, मिनी कूपर, जागवार, मर्सिडीज, फोर्स, रोल्स, रॉयल्स यासारख्या चार चाकी तर अमेरिका ड्रीम्स, डुकाटी, मॉन्स्टर, स्क्रॅंबलर या दुचाकींच्या प्रेमात श्रीमंत मुंबईकर पडले आहेत वर्षभरात कोट्यावधी किमतीच्या महागड्या वाहनांची खरेदी करण्यात आली आहे.

अशी आहे आकडेवारी

इलेक्ट्रिक, सीएनजी, पेट्रोल, डिझेल, यासारख्या इंधनावर धावणारी ही वाहन आहेत. प्रतिष्ठा आणि आरामदायी प्रवासासाठी या वाहनांची खरेदी वाढली आहे. 2024 मधील 19 डिसेंबर रोजीपर्यंत ताडदेव आरटीओमध्ये 665, अंधेरी आरटीओमध्ये 495, वडाळा आरटीओमध्ये 130, बोरिवली आरटीओमध्ये 120 अशा एकूण 1410 वाहनांची खरेदी करण्यात आली आहे.

वाहनांचा दुरुस्ती खर्च अधिक

या वाहनांचा दुरुस्तीचा खर्च अधिक आहे. या वाहनांवर 20 टक्के नोंदणी शुल्क आकारण्यात आले आहे. गेल्या वर्षी 1410 वाहनांची नोंदणी झाली.  या वाहनांची किंमत एक कोटीहून अधिक आहे. मुंबईत ताडदेव आरटीओ मध्ये सर्वाधिक वाहनांची नोंदणी करण्यात आली आहे. त्याद्वारे परिवहन विभागाला कोट्यावधी रुपयांचा महसूल मिळाला आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

शिवसेना आमदार सुनील शिंदे यांच्या कारला बेस्टची धडक, सुदैवाने बचावले शिवसेना आमदार सुनील शिंदे यांच्या कारला बेस्टची धडक, सुदैवाने बचावले
शिवसेना आमदार सुनील शिंदे यांच्या कारला आज दुपारी खेड गल्ली येथे बेस्ट बसने धडक दिली. मात्र आमदार शिंदे काही क्षणांपूर्वीच...
अपुऱ्या सुविधांमुळेच मुलींची शाळेला दांडी, सुलभ स्वच्छता मिशन फाऊंडेशनचा चिंताजनक अहवाल
शमीचे पुनरागमन, बुमराही खेळणार, सिराज बाहेर!
जोगेश्वरीतील पाणीटंचाईवर लवकरच तोडगा; पालिका आयुक्त बोलवणार बैठक, शिवसेनेच्या मागणीला यश
सातासमुद्रापार घुमणार ‘जय भवानी, जय शिवाजी’चा नारा, लिव्हरपूल येथे दणक्यात साजरी होणार शिवजयंती
केईएमच्या शतक महोत्सवाचा शुभारंभ, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
नोकरीतला वारसा हक्क कायम, कामगारांचा भव्य विजयी मेळावा