32 वर्षांत एकदाही आजारपणाची सुट्टी नाही; निवृत्ती दिवशीही बंदोबस्तासाठी तैनात
देशसेवा या ध्येयाप्रती अनेकजण पोलीस दलात भरती होतात. त्यापैकीच एक म्हणजे उपनिरीक्षक दत्तात्रय कोंडे. 32 वर्षे सहा महिने अखंड पोलीस सेवा करून ते 31 डिसेंबरला सेवानिवृत्त झाले. पण कामाच्या शेवटच्या दिवशीही त्यांनी इमाने इतबारे बंदोबस्त करत आपले कर्तव्य बजावले.
दत्ताराम कोंडे हे 1992 ला रेल्वे पोलीस दलात रुजू झाले तेव्हापासून कोंडे यांनी आपल्या कामाची चुणूक दाखवत पोलीस दलाला साजेशी अशी कामगिरी केली. विशेष म्हणजे आपल्या 32 वर्षे सहा महिने 15 दिवसांच्या पोलीस सेवेत कोंडे यांनी एकदाही आजार पणाची सुट्टी घेतली नाही. शिवाय वर्षाकाठी असलेल्या सुट्टय़ाही क्वचितच, खरंच गरज असेल तेव्हाच सुट्टी घेतली. गुन्हे प्रकटीकरण पथकात राहून कोंडे यांनी गुन्हे उघडकीस आणण्याची चांगली कामगिरी पार पाडली. म्हणूनच त्यांना पोलीस महासंचालक पदक तसेच 134 रिवॉर्ड मिळालेत. भरीव कामगिरी करणारे कोंडे 31 डिसेंबरला सेवानिवृत्त झाले. नियमानुसार ते सायंकाळी 5 वाजता कार्यमुक्त होणे गरजेचे होते. परंतु त्यांनी पोलीस दलाप्रती असलेल्या निष्ठापोटी थर्टी फर्स्ट नाईटचा बंदोबस्त करून सेवानिवृत्ती स्वीकारली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List