मुंबईच्या समुद्रात पुन्हा बोट अपघात, मोठ्या जहाजाची बोटीला धडक, मध्यरात्री खोल समुद्रात बचावाचा थरार

मुंबईच्या समुद्रात पुन्हा बोट अपघात, मोठ्या जहाजाची बोटीला धडक, मध्यरात्री खोल समुद्रात बचावाचा थरार

Mumbai Boat Accident : मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणाऱ्या एका प्रवासी बोटीचा भीषण अपघात झाला होता. भारतीय नौदलच्या वेगवान स्पीड बोटीने जोरदार धडक दिल्याने ही बोट उलटली. या दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू झाला. त्यात नौदलाच्या तीन कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. या दुर्घटनेतून अद्याप मुंबईत सावरलेली नाही. त्यातच आता मुंबईच्या मढ समुद्रकिनारी एक मासेमारी करणारी बोट बुडाल्याची घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील मालाड परिसरात असलेली मढ कोळीवाड्यात मासेमारी करण्यासाठी गेलेली बोट बुडाल्याची दुर्घटना घडली आहे. काल रात्री १२.०० ते १२.३० च्या सुमारास मढ कोळीवाड्यातील तिसाई बोटीचा दुर्देवी अपघात झाला. या बोटीला एका मालवाहू जहाजाने धडक दिली. त्यामुळे ही बोट उलटली. सुदैवाने त्यावेळी आजूबाजूला काही बोटी असल्याने मासेमारी करण्यासाठी गेलेल्या कोळी लोकांचा जीव वाचला.

मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या नौकेला धडक 

मालाडमधील मढ परिसरातील हेमदीप हरिश्चंद्र टिपरी हे नेहमीप्रमाणे मढ कोळीवाडा या ठिकाणी मासेमारी करण्यासाठी गेले होते. त्याचदरम्यान चायनाच्या एका मालवाहू जहाजाने त्यांच्या मासेमारी करणाऱ्या नौकेला धडक दिली. त्यामुळे ही नौका बुडाली. या नौकेवर असणारे तांडेल/खलाशी यांना बाजूला असलेल्या सवटी ग्रुपच्या नौकांनी सुखरुप बाहेर काढले. तसेच याच ग्रुपच्या आठ बोटीने नौका बांधून आणली. आज ही नौका मढ, तलपशा बंदरात पोहोचण्याचा अंदाज आहे. यावेळी नेव्ही/कोस्ट गार्डचे जहाज बरोबर आहे. तसेच दोन अधिकारी रात्रीपासून नौकांवर मदत करत आहेत.

गेट वे ऑफ इंडियाला बोटीला अपघात, १३ जणांचा मृत्यू

दरम्यान मुंबईत बुधवारी (18 डिसेंबर) दुपारी ४ च्या सुमारास बोटीला अपघात घडला. मुंबईतून एलिफंटाच्या दिशेने जाणाऱ्या नीलकमल या प्रवाशी बोटीला भारतीय नौदल (Indian Navy) च्या वेगवान स्पीड बोटीने जोरदार धडक दिली. या स्पीड बोटीने आधी एक मोठा राऊंड मारला. यानंतर ती बोट नीलकमल या बोटीला समोरून धडक दिली.

ही धडक इतर जबरदस्त होती की आधी या बोटीला मोठे भगदाड पडले आणि त्यानंतर काही क्षणात ही बोट बुडाली. या अपघातावेळी बोटीमध्ये 100 पेक्षा अधिक प्रवासी होते. नेव्हीच्या स्पीड बोटीचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातात आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ९८ जणांना वाचवण्यात यश आले आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘तारक मेहता..’मधील भिडे मास्तरांच्या लेकीने बांधली लग्नगाठ; पहा व्हिडीओ ‘तारक मेहता..’मधील भिडे मास्तरांच्या लेकीने बांधली लग्नगाठ; पहा व्हिडीओ
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत भिडे मास्तरांची लेक सोनू भिडेची भूमिका साकारलेली अभिनेत्री झील मेहता नुकतीच लग्नबंधनात अडकली...
मिरजेतील ‘हिंद एज्युकेशन’च्या शिक्षकासह लिपिकाला अटक; पगाराची रक्कम मंजूर करण्यासाठी लाखाची मागणी
Pune crime news – पुरोगामी पुण्यात भोंदूंची ‘बाबागिरी’, चाकूच्या धाकाने बलात्कार
शिक्षण विभागाचा अजब कारभार, वर्ष संपत आले तरी दुसरा गणवेश मिळालाच नाही; सांगलीत 1 लाख 16 हजार विद्यार्थी गणवेशापासून वंचित
Satara crime news – औंधच्या युवकाचा गोपूजमध्ये खून; 12 तासात दोन आरोपी जेरबंद
New Year 2025: रोहित शर्मापासून जसप्रीत बुमरापर्यंत सर्वांनी दिल्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा
पाटबंधारे विभागाचा अजब कारभार, कर्जतच्या पाली भूतवली धरणाचे पाणी शेतकऱ्यांना नाकारले