‘त्यांनी माझ्या स्कर्टमध्ये हात घातला अन्…’, सुप्रसिद्ध गायिकेचा हृतिक रोशनच्या काकांवर गंभीर आरोप
काही वर्षापूर्वी आलेल्या ‘मी टू’ या वादळामुळे हॉलिवूड, बॉलिवूडसह संपूर्ण चित्रपटसृष्टी हादरून गेली होती. अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींनी, कलाकारांनी बड्या अभिनेत्यांवर आणि दिग्दर्शकांवर लैंगिक छळाचे आरोप केले होते. हे आरोपांचे वादळ अद्यापही घोंगावत असून आता सुप्रसिद्ध बंगाली गायिका लग्नजिता चक्रवर्ती हिने नुकत्याच एका मुलाखतीमध्ये आपल्यावर ओढावलेला धक्कादायक प्रसंग सांगितला आहे. लग्नजिता हिने ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक आणि अभिनेता हृतिक रोशनचे काका राजेश रोशन यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. काही वर्षांपूर्वी राजेश रोशन यांच्या घरातच ही घटना घडल्याचे तिने सांगितले.
एका पॉडकास्टवर बोलताना लग्नजिता हिने राजेश रोशन यांच्या सांताक्रूझमधील घरामध्ये घडलेला प्रसंग सांगितला. एका कामानिमित्त मी त्यांच्या सांताक्रूझ येथील निवासस्थानी भेट दिली होती. त्यांचे घर खुपच मोठे होते. घर अगदी व्यवस्थित आणि छान सजवलेले होते. आम्ही त्यांच्या म्युझीक रुममध्ये बसलो होतो. तिने अनेक प्रकारची वाद्य होती, असे लग्नजिता हिने सांगितले.
मी बसले, तिथेच शेजारी ते येऊन बसले. मी काही जाहिरातींच्या जिंगल्स गायल्या. टेबलावर एक आयपॅड होता आणि त्यांनी मला मी आतापर्यंत केलेले काम दाखवायला सांगितले. मी आयपॅडवर माझ्या आवाजातील गाणी इतर ब्राऊझ करत असताना ते माझ्याकडे सरकले. मी तेव्हा काही प्रतिक्रिया दिली नाही. त्यानंतर त्यांनी त्यांचा हात माझ्या स्कर्टमध्ये टाकला. मी ओरडले नाही, कारण मला वाटले चुकून झाले असावे. पण ती चूक नव्हती, असे लग्नजिता म्हणाली. दरम्यान या आरोपांवर हाजेश रोशन यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
कास्टिंग काऊच हे बॉलिवूड किंवा अभिनय क्षेत्रातच नसून संगीत क्षेत्रातही असल्याचे लग्नजिता म्हणाली. राजेश रोशन हेच नाही तर इतर अनेक नामांकित सेलिब्रिटींसोबतही आपल्याला असे अनुभव आल्याचे ती म्हणाली. मात्र यावेळी तिने आणखी कोणतेही नाव घेण्यास नकार दिला. यामुळे मोठा गदारोळ होईल आणि माझे जगणे कठीण होईल, असे ती म्हणाली.
दरम्यान, लग्नजिता चक्रवर्ती ही एक बंगाली पार्श्वगायिका आहे. तिने अनेक जाहिरातांच्या जिंगल्सला आवाज दिला आहे. तसेच Boshonto Eshe Geche हे लोकप्रिय बंगाली गाणेही तिनेच गायलेले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List