प्रसिद्ध रेडिओ जॉकी सिमरन सिंगची आत्महत्या, पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

प्रसिद्ध रेडिओ जॉकी सिमरन सिंगची आत्महत्या, पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

प्रसिद्ध रेडिओ जॉकी आणि इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर सिमरन सिंहने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सिमरन सिंहचा मृतदेह गुरग्राममधील एका खोलीत पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला. सध्या याप्रकरणाची सखोल चौकशी सुरु आहे. सिमरन सिंह ही प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर असून तिचे इन्स्टाग्रामवर 6 मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. तिच्या आत्महत्येची बातमी समजताच अनेक चाहत्यांना धक्का बसला आहे. सध्या अनेकजण तिच्या फोटो आणि व्हिडीओवर कमेंट करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनसुार, सिमरन सिंग ही दिल्लीच्या गुरुग्राम परिसरात भाड्याने राहत होती. बुधवारी रात्रीच्या सुमारास सिमरनचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला. तिच्या एका मैत्रिणीने पोलिसांना याबद्दलची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी तिच्या रुमची तपासणी केली. पण कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही. यानंतर पोलिसांनी तिचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. तसेच तिच्या कुटुंबियांनाही याबद्दलची माहिती देण्यात आली.

सिमरन ही दोन वर्षापासून या ठिकाणी राहत होती. बुधवारी तिच्या रुमचा दरवाजा खूप वेळ बंद होता. त्यामुळे खिडकीतून पाहिले असता तिने ओढणीच्या सहाय्याने पंख्याला गळफास घेतला होता.

सिमरन सिंह ही जम्मूच्या डिग्याना परिसरात राहत होती. गेल्या दोन वर्षांपासून ती गुरुग्राममधील सेक्टर ४७ मध्ये भाड्याने राहत होती. ती फ्रिलान्सर म्हणून काम करत होती. तसेच ती सोशल मिडिया इन्फ्लुअन्सरही होती. ती विविध मजेशीर व्हिडीओ बनवून पोस्ट करायची. तिचा इन्स्टाग्रामवर मोठा चाहता वर्ग होता.

सिमरन सिंग ही इन्स्टाग्रामवर प्रचंड सक्रीय असायची. तिचे ७ लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स होते. तिला जम्मूची धडकन म्हणून ओळखले जायचे. सिमनर ही रेडिओ मिरची या ठिकाणी आरजे म्हणून काम करत होती. ती २०२१ पर्यंत आर जे म्हणून काम करत होती. पण त्यानंतर तिने नोकरी सोडली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुलाचा रंग गोरा तर मुलगी सावळी..; वर्णभेदावर ट्विंकल खन्नाचं सडेतोड उत्तर मुलाचा रंग गोरा तर मुलगी सावळी..; वर्णभेदावर ट्विंकल खन्नाचं सडेतोड उत्तर
1990 च्या दशकात ट्विंकल खन्ना ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक होती. लग्नानंतर तिने चित्रपटांमध्ये फारसं काम केलं नाही. ती लिखाणाकडे...
सलमानच्या बर्थडे पार्टीत कथित गर्लफ्रेंडने वेधलं सर्वांचं लक्ष; पहा फोटो
आणखी काही बोलायची गरज आहे का? सोनाक्षीच्या वादावरून शत्रुघ्न सिन्हा यांनी सोडलं मौन
पुणे विभागातील 29 रक्तपेढ्यांचे परवाने निलंबित, एफडीएचा दणका; नियमांचे उल्लंघन केल्याने कारवाई
रेशनकार्डधारकांना ई-केवायसीसाठी मुदतवाढ द्या! गडहिंग्लजला शिवसेनेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन
Photo Pro Kabaddi: यूपी योद्धाज प्रथमच उपांत्य फेरीत
धक्कादायक… ज्युनियर क्लार्कने मारल्या न्यायाधीशांच्या खोट्या सह्या