वर्षभरात सर्वाधिक लोकप्रिय ठरलेले 10 चित्रपट; दहावा सिनेमा थेट ऑस्करला

वर्षभरात सर्वाधिक लोकप्रिय ठरलेले 10 चित्रपट; दहावा सिनेमा थेट ऑस्करला

IMDb (www.imdb.com) या मूव्हीज, टीव्ही शोज आणि सेलिब्रिटींबद्दलच्या माहितीच्या जगातील सर्वांत लोकप्रिय आणि विश्वसनीय स्रोताने 2024 मध्ये जगभरातील IMDb ग्राहकांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या 10 भारतीय चित्रपटांची यादी जाहीर केली आहे. IMDb दरवर्षाच्या अखेरीस ही यादी जाहीर करते. जगभरामध्ये दर महिन्याला काय बघावं हे शोधण्यासाठी IMDb वर येणाऱ्या 25 कोटींहून अधिक प्रेक्षकांच्या वास्तविक पेज व्ह्यूजनुसार याचं मूल्यमापन केलं जातं. वर्षभरात लोकप्रिय ठरलेल्या टॉप 10 भारतीय चित्रपटांच्या यादीतील तीन चित्रपट हॉरर आणि हॉरर कॉमेडी या श्रेणीतील आहेत. ‘स्त्री 2’, ‘शैतान’ आणि ‘भुलभुलैय्या 3’ या चित्रपटांना प्रेक्षकांकडून सर्वाधिक पसंती मिळाली आहे.

2024 या वर्षी प्रभासचा ‘कल्की 2898-एडी’ हा चित्रपट या यादीत अग्रस्थानी आहे. यामध्ये प्रभाससोबतच दीपिका पादुकोण, अमिताभ बच्चन, कमल हासन यांच्याही मुख्य भूमिका होत्या. या यादीत अभिनेत्री श्रद्धा कपूरचा ‘स्त्री 2’ हा हॉरर कॉमेडी चित्रपट दुसऱ्या स्थानी आहे. तर तिसऱ्या स्थानी ‘महाराजा’ हा चित्रपट आहे. आर. माधवन आणि अजय देवगण यांचा ‘शैतान’ हा चित्रपट चौथ्या क्रमांकावर असून पाचव्या क्रमांकावर हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोण यांचा ‘फायटर’ हा चित्रपट आहे. सहाव्या स्थानी ‘मंजुमेल बॉइज’ आणि सातव्या स्थानी ‘भुलभुलैय्या 3’ हा कार्तिक आर्यनचा चित्रपट आहे. आठव्या क्रमांकावर ‘किल’, नवव्या क्रमाकांवर ‘सिंघम अगेन’ आणि दहाव्या क्रमाकांवर ‘लापता लेडीज’ हे चित्रपट आहेत. यापैकी आमिर खानची पूर्व पत्नी किरण राव दिग्दर्शित ‘लापता लेडीज’ हा चित्रपट भारताकडून ऑस्करसाठी पाठवण्यात आला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by IMDb India (@imdb_in)

आयएमडीबी रेटिंग म्हणजे काय?

आयएमडीबी म्हणजेच इंटरनेट मुव्ही डेटाबेस. आयएमडीबी हा ऑनलाइन डेटाबेस प्लॅटफॉर्म असून त्यावर चित्रपट पाहणारे रसिकप्रेक्षक आपल्या रेटिंगद्वारे एखाद्या कलाकृतीचा दर्जा ठरवतात. या प्लॅटफॉर्मवर स्टार्स पद्धतीने रेटिंग दिलं जातं. 10 हे सर्वाधिक रेटिंग असून चित्रपट, मालिका, वेब सीरिज, व्हिडीओ गेम्स अशा विविध गोष्टींना इथं रेटिंग देता येतं. आयएमडीबीचं रेटिंग जितकं अधिक तितका तो चित्रपट, मालिका किंवा वेब सीरिज लोकांना भावल्याची पोचपावती असते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मोठी बातमी! धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढणार? तो Video समोर, एका हातात पिस्तूल तर गाडीत… मोठी बातमी! धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढणार? तो Video समोर, एका हातात पिस्तूल तर गाडीत…
मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत आता आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. सामाजिक...
अनेक विवाहित पुरुषांच्या प्रेमात, सौरव गांगुलीशी अफेअर; अन् अचानक बॉलिवूडमधून ही अभिनेत्री गायब
सलमान खानने सर्वांसमोर स्वत:ला चाबकाचे फटके मारले; सेटवरील सगळे पाहतच बसले
काँग्रेस ‘संविधान बचाओ पद यात्रा’ काढणार, CWC च्या बैठकीत कोणते प्रस्ताव झाले मंजूर? जाणून घ्या
माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांची प्रकृती खालावली, एम्समध्ये दाखल
सत्ताधाऱ्यांमुळे महात्मा गांधींचा वारसा धोक्यात, सोनिया गांधी यांची भाजपवर टीका
दैनिक सामना दिनदर्शिकेचे खासदार संजय राऊत यांचे हस्ते प्रकाशन