तेच निळे डोळे, तोच चेहरा; ‘ही’ बिझनेस वुमन दिसते ऐश्वर्या रायची जुळी बहिण, पण ऐश्वर्यासारखं दिसण्याची आहे चीड
ऐश्वर्या राय सध्या कोणत्याना कोणत्या कारणाने चर्चेत असतेच. पण ती जास्त करून तिच्या सौंदर्यासाठी आजही तेवढीच लोकप्रिय आहे. अनेकदा तिच्या लूकही चर्चा होताना दिसते. मात्र अलिकडेच एक बिझनेस वुमन ऐश्वर्यामुळे चर्चेत आली आहे. जी ऐश्वर्याची जुळी बहिण वाटते.
ऐश्वर्याची जुळी बहिणच वाटते
या महिलेला पाहाताच पटकण ऐश्वर्या रायच डोळ्यासमोर येते. ही महिला पाकिस्तानी उद्योगपती कंवल चीमा आहे. आजकाल हीचे फोटो प्रचंड व्हायरल झालेले दिसतात.कंवल चीमा हे माय इम्पॅक्ट मीटरची फाउंटर आणि सीईओ आहेत. ती इस्लामाबाद, पाकिस्तानची आहे.
कंवल चीमा सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह आहे. तसंच, तिच्या नेटवर्थबद्दल बोलायचे झाल्यास तिने 200 अरब डॉलरची कंपनीतील लाखो रुपयांची नोकरी सोडून स्वतःचं स्टार्टअप सुरू केलं. तिने डिजिटल स्टार्टअप डिजिटल प्लॅटफॉर्म माय इम्पॅक्ट मीटर (एमआयएम) सुरू केले.
कंवलने आपले सुरुवातीचे शिक्षण पाकिस्तानमध्ये केले आणि नंतर रियाध, सौदी अरेबिया येथे आपले शिक्षण सुरू ठेवले. यानंतर त्यांचे कुटुंब पाकिस्तानात परतले. कंवल ही एक यशस्वी बिझनेसवुमन असून सोशल मीडियावर तिची लोकप्रियता झपाट्याने वाढत आहे. ती ऐश्वर्या रायसारखी दिसत असल्याचे बोललं जातं.
कंवलची स्टाइल ऐश्वर्याशी मिळतीजुळती
कंवल चीमाचा लूक, डोळे, आवाज आणि स्टाइल ऐश्वर्या रायशी मिळतीजुळती आहे. कंवलच्या चेहऱ्याची वैशिष्ट्ये ऐश्वर्याशी मिळतीजुळती आहेत. तिची मेकअप स्टाइल ऐश्वर्यासारखीच आहे. एवढच नाही तर कंवलची स्वत:ला सादर करण्याची पद्धतही ऐश्वर्याच्या शैलीशी जुळते. पण आश्चर्य म्हणजे तिची तुलना ऐश्वर्याशी केलेली तिला अजिबात आवडत नाही. तिला या गोष्टीची प्रंचड चिड आहे.
ऐश्वर्या रायशी तुलना न आवडणारी
एका मुलाखतीत कंवलला जेव्हा तिची ऐश्वर्या रायशी तुलना करण्याबद्दल विचारण्यात आले तेव्हा तिने संभाषण टाळण्याचा प्रयत्न केला. या विषयावर बोलू इच्छित नसल्याचे कंवलने सांगितले. तिने विनंती केली “तुम्ही माझे भाषण ऐकले असेल तर माझ्या दिसण्याऐवजी त्यावर चर्चा का करत नाही?” असं म्हणत तिने या विषयावर बोलणे टाळले आहे.
कंपनीच्या व्यवस्थापनासोबतच ती पाकिस्तान उद्योजक संघटनेच्या अध्यक्षाही आहेत. तिच्या स्टार्टअपद्वारे ती जगभरातील गरजूंना मदत करू इच्छिणाऱ्या लोकांना मदत करते. मदत पुरवणारा आणि गरजू हे दोघं या प्लॅटफॉर्मद्वारे जोडले जातात. लोकांना जी काही मदत द्यायची आहे ती या प्लॅटफॉर्मच्या मदतीने गरजूंपर्यंत पोहोचवता येते. तसेच ती तिच्या यशाचे श्रेय तिच्या पती व सासरच्या व्यक्तींना देते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List