अंबाजोगाईत पोलीस चौकीसमोरच तरुणावर कोयत्याने वार
पोलिसांचा वचक संपल्यामुळे बीड जिल्हय़ात गुन्हेगारांचा नंगानाच चालू आहे. अंबाजोगाईत पोलिसांच्या नाकासमोर एका तरुणावर चार जणांनी कोयत्याने वार केला. पोलीस चौकीच्या समोर रक्ताचा सडा पाडून चौघेही राजरोस पळून गेले. हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणास स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले.
अंबाजोगाईत स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात असलेल्या पोलीस चौकीसमोर ही घटना घडली. जमीर उैर्फ मुन्ना मोहियोद्दीन शेख याला बुधवारी रात्री साडेनऊ वाजता श्रीहरी दौलत मुंडे याने दारू पिण्याचा आग्रह केला. मात्र जमीरने नकार दिला. त्यावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली. रात्री 12.30 वाजता जमीर हा स्वाराती रुग्णालयातील चौकात मित्रांसोबत बसलेला होता. तेव्हा हल्ला करत श्रीहरी मुंडेने जमीरच्या मानेवर कोयत्याने वार केला. त्याच्या मानेला 35 टाके पडले असून तो मृत्यूशी झुंज देत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List