बॉक्स ऑफिसवर 25,000 कोटींचे कलेक्शन करणारा हा पहिलाच अभिनेता; सलमान,शाहरूखलाही मागे टाकलं

बॉक्स ऑफिसवर 25,000 कोटींचे कलेक्शन करणारा हा पहिलाच अभिनेता; सलमान,शाहरूखलाही मागे टाकलं

शाहरूख, सलमान आणि आमिर खान यांचे चित्रपट म्हटलं की ते बॉक्सऑफिसवर छप्परफाड कमाई करणार असा सर्वांचा विश्वास असतो. पण तुम्हाला माहितीये का की यांच्याव्यतिरिक्त या फिल्म इंडस्ट्रीमध्ये एक अभिनेता असाही आहे जो यांच्या कलेक्शनलाही मागे पाडेल. या अभिनेत्याचा अभिनय, त्याची डायलॉग डिलीव्हरी इतकी जबरदस्त आहे की चाहते वेडे होतात.

सलमान,शाहरूख नाही तर या अभिनेत्याचे कलेक्शन छप्परफाड 

या अभिनेत्याचे जवळपा सर्वच चित्रपट सुपर-डुपर हिट आहेत. हा अभिनेत्याला पडद्यावर पाहायला चाहते नेहमीच आतूर असतात. ‘या’ अभिनेत्याने आपल्या अभिनय कौशल्याने, विविध भूमिकांनी आणि जागतिक चित्रपटांमधून 25,000 कोटींचे कलेक्शन करुन एक नवा इतिहास रचला आहे.

बॉलिवूडसह हॉलिवूडमध्येही आपला ठसा उमटवणारा हा सुपरस्टार म्हणजे इरफान खान. या अभिनेत्याचे नाव घेताच सर्वांच्या मनात एकच भावना निर्माण होते ती म्हणजे प्रेम आणि आदर. हा असा एकमेव अभिनेता असेल ज्याचे चित्रपटांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन 25,000 कोटींच्या पुढे गेले आहे. इरफान हे आज आपल्यात नसले तरी त्यांनी मागे सोडलेले चित्रपट आणि त्यांचे अस्तित्व याचे सगळेच फॅन आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Irrfan Khan’s Family (@irrfanation)


प्रत्येक चित्रपट हीट

इरफान यांनी आपले स्टारडम अनेक प्रकारे सिद्ध केले आहे. इरफान खान यांचा जन्म 1967 मध्ये राजस्थानच्या ‘टोंक’ जिल्ह्यात झाला. थिएटरमध्ये काम करणाऱ्या आपल्या मामाकडून प्रेरणा घेऊन त्यांनी अभिनयाच्या जगात पदार्पण केले. 1984 मध्ये दिल्लीच्या ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’मध्ये दाखल झाल्यानंतर त्यांनी अभिनयाचे धडे घेतले.

इरफान यांची 1988 मध्ये मीरा नायरच्या ‘सलाम बॉम्बे’ या चित्रपटाच्या छोट्या भूमिकेने चित्रपट प्रवासाची सुरुवात झाली. त्यानंतर 2003 मध्ये ‘हसिल’, 2004 मध्ये ‘मकबूल’ आणि 2012 मध्ये ‘पान सिंग तोमर’ यासारख्या महत्त्वाच्या चित्रपटांमधून त्याला एक अद्वितीय स्थान मिळाले. ‘हिंदी मीडियम’ (2017) या चित्रपटाने तो लोकप्रियतेच्या शिखरावर ते पोहोचले.

हॉलिवूडमध्येही आपला ठसा उमटवला

इरफान खान यांनी फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर हॉलिवूडमध्येही आपली वेगळी ओळख निर्माण केली.त्यांनी ‘ज्युरासिक वर्ल्ड’, ‘द अमेझिंग स्पायडर-मॅन’, ‘इन्फर्नो’ आणि ‘लाइफ ऑफ पाय’ यासारख्या जागतिक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आणि त्यांच्या अभिनयाने अंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांना स्टारडम मिळवून दिले.

चित्रपटांचे 25,000 कोटींचे कलेक्शन

इरफान खान यांच्या बॉलिवूडमधील चित्रपटांनी एकूण 2,000 कोटी रुपये कमावले आहेत. तर हॉलिवूड चित्रपटाने 22,500 कोटी. चित्रपटांचे जेवढे कलेक्शन इरफान यांनी त्यांच्या नावावर करून घेतलं आहे त्यापेक्षा शाहरूख, सलमान आणि आमिर खान यांच्यासारख्या कलाकारांचे कलेक्शनपेक्षा मागे पडले.

रिपोर्टनुसार शाहरूख खानच्या चित्रपटांनी 9,000 कोटी रुपये, सलमान खानच्या चित्रपटांनी 7,000 कोटी रुपये आणि आमिर खानच्या चित्रपटांनी 6,500 कोटी रुपये कमावले

इरफान खान त्यांच्या चित्रपटांच्या माध्यमातून नेहमीच जिवंत 

2020 मध्ये कर्करोगामुळे वयाच्या 53 व्या वर्षी इरफान खान यांचे निधन झाले, पण त्यांचे काम, त्याचा अभिनय आणि त्यांनी चित्रपटसृष्टीत दिलेलं स्वत:चं योगदान कायमम जिवंत राहिलं. त्यांचे नाव आजही तेवढ्याच आदराने आणि प्रेमाने घतले जातं आणि पुढेही नक्कीच घेतलं जाईलं

 

 

 

 

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

करोडोंची गाडी पंतप्रधानांची, माझी तर मारुती 800 आहे! भाजपच्या मंत्र्यानं सांगितला मनमोहन सिंग यांचा साधेपणा करोडोंची गाडी पंतप्रधानांची, माझी तर मारुती 800 आहे! भाजपच्या मंत्र्यानं सांगितला मनमोहन सिंग यांचा साधेपणा
देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. दिल्लीतील एम्स रुग्णालयात 10 च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास...
भरकटलेल्या तरुणाची केली सुखरूप घरवापसी, सिक्युर कंपनीच्या स्टाफची कौतुकास्पद कामगिरी
बलात्कार प्रकरणात जामीन मिळालेल्या भाजपा आमदारावर फेकली अंडी
राजगुरूनगरमध्ये दोन चिमुरड्यांची हत्या; एकीवर अत्याचार 54 वर्षीय नराधमाला अटक
‘आंबेडकरी आई’ ग्रंथाचे शनिवारी दादरमध्ये प्रकाशन
विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी येणार ; देश-विदेशातून अनुयायी
नवे सरकार येताच मंत्रालयातील 602 क्रमांकाचे दालन पुन्हा चर्चेत