वर्षाचा बंपर क्लायमॅक्स; ‘अप्पी आमची कलेक्टर’ मालिकेत मोठा ट्विस्ट
'झी मराठी' वाहिनीवरील 'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेचं कथानक अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. प्रेम, जिद्द आणि कुटुंब यातून सध्या ही मालिका जात आहे. जिथे अप्पी आणि अर्जुनच्या लग्नाचा दिवशी नाट्यमय घडामोडी घडताना दिसतात.
पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकण्याची तयारी करत असताना या दोघांना पुन्हा एकदा संकटाचा सामना करावा लागतो. अमोलची गंभीर शस्त्रक्रिया होत असताना ते अमोलच्या सोबत राहण्याचा निर्धार करतात.
हॉस्पिटलमध्ये जात असताना संकल्प समोर आल्याने संकल्पचे भयानक मनसुबे उघडकीस येतात. त्याने अमोलच्या वैद्यकीय अहवालात फेरफार करून त्याच्या जीवाला धोका निर्माण केला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List