OTT वर कुणाचं आधिराज्य, टॉप 10 चित्रपट -मालिका कोणत्या, जाणून घ्या

OTT वर कुणाचं आधिराज्य, टॉप 10 चित्रपट -मालिका कोणत्या, जाणून घ्या

OTT वर सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या या टॉप १० चित्रपट-मालिका, पाहा यादीत कोणाचे नाव हल्लीच्या व्यस्थ जीवनशैलीमुळे अनेकांना सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघता येत नाही अश्यावेळेस थिएटरवर सिनेमे पाहण्यापेक्षा लोक ओटीटीकडे अधिक वळले आहेत. दर महिन्याला ऑर्मॅक्स मीडियाची एक यादी समोर येते, ज्यात टॉप १० चित्रपट-मालिका आणि मालिकांची नावे नमूद केली जातात, जे गेल्या आठवड्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर लोकांनी सर्वाधिक पाहिले होते. या आठवड्यात ओटीटीवर कोण कोणते शो, सीरिज आणि चित्रपट सर्वाधिक पाहिले गेले आहेत ते जाणून घेऊयात.

या आठवड्यात ओटीटीवर पाहिलेले टॉप 10 शो, चित्रपट आणि मालिका

‘सिकंदर का मुकद्दर’

नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला सिकंदर का मुकद्दर हा एक थ्रिलर चित्रपट आहे, ज्यात जिमी शेरगिल, अविनाश तिवारी, तमन्ना भाटिया, राजीव मेहता आणि दिव्या दत्ता याच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट या आठवड्यात ओटीटीवर सर्वाधिक लोकांनी पाहिला आहे, ज्यामुळे हा चित्रपट टॉप 1 वर आहे.

‘द ग्रेट इंडियन कपिल शो सीझन २’

नेटफ्लिक्सवर येणारा कपिल शर्माचा ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’चा दुसरा सीझनही लोकांना खूप आवडत आहे. नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये रेखाने शोमध्ये एन्ट्री केली आणि तो एपिसोड लोकांनी सर्वात जास्त पाहिला आहे. ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ या आठवड्याच्या ऑर्मॅक्स मीडिया लिस्टमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे.

‘ठुकरा के मेरा प्यार’

डिस्ने प्लस हॉटस्टारची नवी मालिका ठुकरा के मेरा प्यार मध्ये कोणतेही मोठे रहस्य नसले तरी लोकं ही मालिका खूप बघत आहेत. या आठवडय़ात ही मालिका टॉप ३ मध्ये कायम आहे.

‘ये काली-काली आंखें’

प्रेम, विश्वासघात आणि उत्कटतेच्या कथेवर आधारित ‘ये काली काली आंखें’ ही थ्रिलर मालिका गेल्या आठवड्यात ओटीटीवर चौथ्या क्रमांकावर सर्वाधिक पाहिली गेली आहे. नेटफ्लिक्सवर तुम्ही ‘ये काली-काली आंखे’ ही मालिका पाहू शकता.

‘तनाव सीजन 2’

सोनी लाईव्हवरील ‘तनाव सीजन 2’’ देखील चर्चेत असून टॉप ५ मध्ये आहे. या मालिकेचा पहिला सीझनही लोकांना आवडला होता आणि दुसऱ्या सीझनलाही भरभरून प्रेम मिळत आहे.

‘हार्टबीट’

शिवांगी जोशी, जन्नत जुबेर आणि हर्ष बेनीवाल यांची ‘हार्टबीट’ या स्टार वेब सीरिजला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून ही मालिका टॉप 6 मध्ये आहे. ॲमेझॉन एमएक्स प्लेअरवर तुम्ही ही सीरिज पाहू शकता.

मोहरे

ॲमेझॉन एमएक्स प्लेअरवरील मोहरे या वेब सीरिजमध्ये जावेद जाफरी खलनायकाच्या भूमिकेत दिसला असून लोक ही क्राइम थ्रिलर सीरिज पाहत आहेत आणि या आठवड्यात ही वेबसिरीज टॉप 7 वर आहे.

अग्नि

प्रतीक गांधी, दिव्येंदू शर्मा, सैयामी खेर यांचा ‘अग्नी’ हा स्टारर चित्रपट येताच ओटीटीवर कव्हर झाला असून या आठवड्यात हा चित्रपट टॉप ८ मध्ये कायम आहे.

‘कैम्पस बीट्स सीजन 4’

‘कॅम्पस बीट्स’चा चौथा सीझन ओटीटीवर खूप पाहिला जात असून या आठवड्यात ही मालिका नवव्या क्रमांकावर कायम आहे.

‘द राणा दग्गुबाती शो’

तेलुगू टॉक शो ‘द राणा दग्गुबाती शो’ प्राइम व्हिडिओ खूप पाहिला जात आहे आणि या आठवड्यात राणा दग्गुबातीचा भाऊ नागा चैतन्य आणि त्याचा चुलत भाऊ शोमध्ये खास पाहुणे म्हणून आले आहेत. त्यामुळे हा शो टॉप 10 लिस्टमध्ये आला आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

महादेव बेटिंग अ‍ॅप पुन्हा चर्चेत; सुरेश धस यांचे गंभीर आरोप, केली मोठी मागणी महादेव बेटिंग अ‍ॅप पुन्हा चर्चेत; सुरेश धस यांचे गंभीर आरोप, केली मोठी मागणी
आज आमदार सुरेश धस यांनी बीडच्या पोलीस अधीक्षाकांची भेट घेतली, या भेटीनंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी गंभीर आरोप केले...
नाराज भुजबळ राष्ट्रवादीची साथ सोडणार का? अजितदादाच्या शिलेदारानं सांगितली आतली गोष्ट
“कधी-कधी त्या गोष्टी मलाच नडतात..”; ‘शिवा’ फेम पूर्वा कौशिक असं का म्हणाली?
प्रदर्शनाच्या 22 दिवसांनंतर ‘पुष्पा 2’मधील गाणं करावं लागलं डिलिट; अल्लू अर्जुनचा वाद भोवला
जाणून घ्या हिवाळ्यात अळशीच्या बिया खाण्याचे फायदे अन् तोटे
‘या’ 3 गोष्टींच्या मदतीने पांढरे केस होतील काळे, जाणून घ्या
घरी प्रोटीन पावडर कशी बनवावी? ‘या’ पद्धती वापरून पाहा