नाना पाटेकर मुंबई सोडून गावी राहायला का गेले?; म्हणाले, मी तिकडंच…

नाना पाटेकर मुंबई सोडून गावी राहायला का गेले?; म्हणाले, मी तिकडंच…

मुंबईतील स्पीड जरी सुरुवातीला सगळ्याना आवडत असला तरी या धकाधकीच्या जीवनाच्या एका टप्प्यावर कंटाळा येतो. या स्पीड नकोसा वाटतो. गड्या आपला गाव बरा…, असं वाटू लागतं. मग काहीजण गावचा रस्ता धरतात. अभिनेते नाना पाटेकर यांनी देखील मुंबई सोडून गावी जाऊन राहण्याचा निर्णय घेतला आहे. याबद्दल नाना पाटेकर बोलते झाले. ‘कौन बनेगा करोडपती’ कार्यक्रमात नाना पाटेकर बोलत होते. ‘वनवास’ चित्रपटाच्या प्रोमोशनसाठी नाना पाटेकर या कार्यक्रमात आले होते. तेव्हा त्यांनी मुंबई सोडण्याचं कारण सांगितलं.

नाना पाटेकर गावी का राहतात?

मी या व्यवसायातील नाही, मी गावाकडचा माणूस आहे. मी इकडे काम करतो, आणि परत गावात जातो. मी गाव-खेड्यात राहतो, आणि तिथेच राहणार, तिकडेच बरे वाटते, असं नाना पाटेकर म्हणाले. याच कार्यक्रमात नाना पाटेकर यांनी प्रेक्षकांना उद्देशून किस्सा सांगितला. या सेटवर मी आत्ता जेव्हा आत गेलो होतो, तेव्हा मी श्री. बच्चन यांना विचारले की, ‘तुम्ही इतके काम का करता? गावात येऊन आठवडाभर रहा. तिकडे फारच निवांत वाटते. त्यावर त्यांनी मला सांगितले की, ते दिवासातले 12 तास काम करतात. त्याबद्दल मी त्यांच्यापुढे नतमस्तक आहे, असं नाना म्हणाले.

मी सकाळी उठतो, तिकडे मी स्वतःचे एक जिम बनवली आहे. माझ्याकडे दोन गाई आणि एक बैल आहे. आणखी काही असण्याची गरजच नाही- मीच सगळं काही करतो. न्याहारी, जेवण माझं सगळं जेवण मीच बनवतो. मी खरोखर चांगले जेवण बनवतो. कधी कधी तर मला वाटते की, तर माझी चित्रपटात कारकीर्द झाली नसती, तर मी एक छोटेसे हॉटेल उघडले असते. पण, मी जितकी अपेक्षा केली होती, त्यापेक्षा आयुष्याने मला खूप जास्त दिले आहे. माझ्या गरजा अगदी साध्या झाल्या आहेत, असं नाना पाटेकर म्हणाले.

‘वनवास’ चित्रपटातील कलाकार नाना पाटेकर, उत्कर्ष शर्मा, सिमरत कौर आणि लेखक-दिग्दर्शक अनिल शर्मा उपस्थित राहणार आहेत. नाम फाऊंडेशनसाठी नाना पाटेकर खेळले. यावेळी नाना पाटेकर त्यांच्या जिव्हाळ्याच्या विषयाबद्दल बोलताना दिसले. शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर नाना पाटेकर बोलते झाले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

महादेव बेटिंग अ‍ॅप पुन्हा चर्चेत; सुरेश धस यांचे गंभीर आरोप, केली मोठी मागणी महादेव बेटिंग अ‍ॅप पुन्हा चर्चेत; सुरेश धस यांचे गंभीर आरोप, केली मोठी मागणी
आज आमदार सुरेश धस यांनी बीडच्या पोलीस अधीक्षाकांची भेट घेतली, या भेटीनंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी गंभीर आरोप केले...
नाराज भुजबळ राष्ट्रवादीची साथ सोडणार का? अजितदादाच्या शिलेदारानं सांगितली आतली गोष्ट
“कधी-कधी त्या गोष्टी मलाच नडतात..”; ‘शिवा’ फेम पूर्वा कौशिक असं का म्हणाली?
प्रदर्शनाच्या 22 दिवसांनंतर ‘पुष्पा 2’मधील गाणं करावं लागलं डिलिट; अल्लू अर्जुनचा वाद भोवला
जाणून घ्या हिवाळ्यात अळशीच्या बिया खाण्याचे फायदे अन् तोटे
‘या’ 3 गोष्टींच्या मदतीने पांढरे केस होतील काळे, जाणून घ्या
घरी प्रोटीन पावडर कशी बनवावी? ‘या’ पद्धती वापरून पाहा