जो रुटच्या सिंहासनाला इंग्लंडच्याच 25 वर्षीय फलंदाजाने दिला हादरा, कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्या क्रमांकाचा फलंदाज बनला
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) ताज्या कसोटी क्रमवारीनुसार इंग्लंडचा फलंदाज जो रुटच्या सिंहासनाला इंग्लडच्याच 25 वर्षीय हॅरी ब्रुकने हादरा दिला आहे. त्याने आपल्या कसोटी क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये प्रथमच फलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर विराजमान होण्याचा बहुमान पटकावला आहे.
हॅरी ब्रुकने सातत्यपूर्ण फलंदाजी करत आपल्या संघाच्या विजयात वेळोवेळी महत्त्वाची भुमिका पार पाडली आहे. इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये तीन सामन्यांची कसोटी मालिका सुरू असून पहिले दोन्ही कसोटी सामने इंग्लंडने जिंकले आहेत. या दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये हॅरी ब्रुकने जबरदस्त खेळाचे प्रदर्शन केले आहे. त्याने पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात 15 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 197 चेंडूंमध्ये 171 धावा केल्या होत्या. तसेच दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात 115 चेंडूंमध्ये 123 धावा आणि दुसऱ्या डावात 55 धावांची खेळ करत संघाच्या विजयात खारीचा वाटा उचलला. त्याच्या या दमदार खेळामुळे त्याच्या खात्यात 898 रेटींग गुणांची नोंद झाली आणि जो रुटचे पहिल्या क्रमांकाचे सिंहासन हॅरी ब्रुकने आपल्या नावावर केले. जो रुट 897 रेटिंग गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडचा केन विल्यम्सन तिसऱ्या आणि टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वाल 811 रेटींग गुणांसह चौथ्या क्रमांकावर स्थानबद्ध आहे.
गोलंदाजी आणि अष्टपैलु खेळाडूंच्या क्रमावरीवर नजर फिरवल्यास टीम इंडियाच्या खेळाडूंचा दबदबा पहायला मिळत आहे. गोलंदाजीमध्ये टीम इंडियाचे भ्रमास्त्र म्हणजे जसप्रीत बुमरा पहिल्या क्रमांकवर विराजमान आहे. तर अष्टपैलु खेळाडूंच्या यादीमध्ये रवींद्र जडेजा पहिल्या क्रमांकावर आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List