न्यायाधीशाला लाच घेताना रंगेहाथ पकडले, साताऱ्यातील घटनेमुळे खळबळ
साताऱ्यात एका न्यायाधीशाला पाच लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. या घटनेमुळ एकच खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे न्यायालयाच्या आवारातच ही घटना घडली आहे. या प्रकरणी न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासहत तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, फिर्यादीचे वडिल तुरुंगात होते. वडिलांना जामीन हवा असेल तर पाच लाख रुपये दे अशी मागणी साताऱ्याचे जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश धनंजय निकम यांनी केली. एका हॉटेलमध्ये ही रक्कम देण्याचे ठरले. यावेळी लाचलुचपत विभागाने सापळा रचला आणि न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह तिघांना ही लाच स्विकारताना रंगेहाथ पकडलं. पोलिसांनी निकम यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई सुरू केली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List