ऐश्वर्या दुसऱ्यांदा होणार आई? घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान फॅमिली प्लॅनिंगबद्दल अभिषेक म्हणाला..
बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोडी अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या चर्चा अखेर शांत होताना दिसत आहेत. नुकतंच या दोघांना मुंबईतील एका वेडिंग रिसेप्शनमध्ये एकत्र पाहिलं गेलं. त्यानंतर आता अभिषेकचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये तो फॅमिली प्लॅनिंगबद्दल बोलताना दिसून येत आहे.
अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या लग्नाला 16 वर्षे पूर्ण झाली आहेत. या दोघांना आराध्या ही 13 वर्षांची मुलगी आहे. आता रितेश देशमुखच्या 'केस तो बनता है' या शोमध्ये अभिषेकने ऐश्वर्यासोबत दुसऱ्या बाळाच्या प्लॅनिंगबद्दल खुलासा केला आहे.
या फॅमिली प्लॅनिंगची चर्चा तेव्हा सुरू झाली जेव्हा रितेशने बच्चन कुटुंबातील सदस्यांच्या नावाबद्दल सवाल केला. “अमिताभजी, ऐश्वर्या, आराध्या आणि तू अभिषेक. या सर्व नावांची सुरुवात अ या अक्षराने होते. मग जया आंटी आणि श्वेता यांचीच नावं अशी वेगळी का”, असं तो अभिषेकला विचारतो.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List