संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणी अभिनेता अल्लू अर्जुनची तीन तासाहून अधिक चौकशी
हैदराबादमधील संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणी तेलुगु सुपरस्टार अल्लू अर्जुनची मंगळवारी तीन तासांहून अधिक काळ चौकशी करण्यात आली. दुपारी 2.45 पर्यंत चौकशी सुरू होती. चौकशीदरम्यान पोलिसांनी अल्लू अर्जुनला अनेक प्रश्न विचारले. सेंट्रल झोनचे डीसीपी अक्षांश यादव यांच्या नेतृत्वाखालील पोलिस पथकाने अभिनेत्याची चौकशी केली.
चौकशीदरम्यान पोलिसांनी अल्लू अर्जुनला महिलेच्या मृत्यूची माहिती होती का विचारले. यावर अल्लू अर्जुनने आपल्याला दुसऱ्या दिवशी महिलेचा मृत्यू झाल्याचे समजले असे सांगितले. चिक्कडपल्ली पोलिसांनी सोमवारी अल्लू अर्जुनला नोटीस बजावली होती. संध्या थिएटर चेंगराचेंगराप्रकरणी मंगळवारी सकाळी 11 वाजता चौकशीसाठी पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश नोटीशीत देण्यात आले होते.
चार तासांच्या चौकशीनंतर अल्लू अर्जुन घरी परतला. अर्जुनचा बाऊन्सर अँथनीवर धक्काबुक्की केल्याचा आरोप करण्यात आला असून, पोलिसांनी त्याला अटक केली. पोलीस अल्लू अर्जुनला पुन्हा चौकशीसाठी बोलावण्याची शक्यता आहे. तसेच आवश्यकता भासल्यास अभिनेत्याला संध्या शिएटरला नेऊन सीन रिक्रिएशन करण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.
‘या’ प्रश्नांची उत्तरे शोधत आहेत पोलीस
व्यवस्थापनाने अल्लू अर्जुनला संध्या थिएटरमध्ये येऊ नका असे आधीच सांगितले होते का? अल्लू अर्जुनला माहीत आहे का पोलिसांची परवानगी नव्हती? संध्या थिएटरमधील प्रीमियर शोला उपस्थित राहण्यासाठी अल्लू अर्जुनने परवानगी घेतली होती का? अल्लू अर्जुनकडे त्याची प्रत आहे का? अल्लू अर्जुन किंवा त्याच्या पीआर टीमने पोलिसांची परवानगी घेतली होती का? पीआर टीमने संध्या थिएटरजवळील परिस्थितीबद्दल अल्लू अर्जुनला आधीच माहिती दिली होती का? अल्लू अर्जुनने किती बाऊन्सर्सची व्यवस्था केली होती?
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List