Jammu Kashmir – जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराचे वाहन दरीत कोसळले, पाच जवानांचा मृत्यू; चार जण जखमी
जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात मंगळवारी मोठी दुर्घटना घडली. बलनोई परिसरात लष्कराचे वाहन दरीत कोसळून पाच जवानांचा मृत्यू झाला. अन्य 3 ते 4 जवान जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लष्कराचे वाहन रस्ता भरकटल्याने दरीत कोसळले.
नीलम मुख्यालयाकडून बलनोई घोरा पोस्टकडे 11 एमएलआयचे लष्करी वाहन चालले होते. यादरम्यान घोरा पोस्टजवळ रस्ता भरकटल्याने वाहन सुमारे 300-350 फूट खोल दरीत पडले. या वाहनात 8 ते 9 जवान होते. अपघातात सर्व जवान जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच 11 एमएलआयच्या क्विक रिस्पॉन्स टीम (क्यूआरटी)ने घटनास्थळी दाखल होत बचावकार्य सुरू केले.
जखमी जवानांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान 5 जवानांचा मृत्यू झाला. तर अन्य जखमी जवानांवर उपचार सुरू आहेत. हिंदुस्थानी लष्कराच्या व्हाईट नाईट कॉर्प्सने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर अपघाताची माहिती देत सैनिकांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List