Aamir khan : तू माझ्याशी बोलशील ना ग ? आमिरने करीनाला असं का विचारलं ?
करीना कपूर खान आणि आमिर खान यांची प्रमुख भूमिका असलेला ‘लाल सिंह चड्ढा’ हा चित्रपट 2022 साली प्रदर्शित झाला. कोविड -19 च्या वेळेस या चित्रपटाचे शूटिंग झाले होते. या चित्रपटाची कहाणी, त्यातील कलाकारांचं काम याचं तर लोकांनी खूप कौतुक केलं,पण चित्रपट तर बॉक्स ऑफीवर फ्लॉप ठरला. लाल सिंग चड्ढा हा ‘फॉरेस्ट गंप’ या इंग्रजी चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. करीना कपूर नुकतीच या चित्रपटाबद्दल बोलत होती , हा चित्रपट फ्लॉप झाल्याने आमिर खानला खूप वाईट वाटल्याचं करीनाने नमूद केलं.अद्वैत चंदनने दिग्दर्शित केलेला हा चित्रपट फ्लॉप झाल्याने आमिर खान प्रचंड निराश झाला होता. 180 कोटी रुपयांमध्ये बनलेला हा चित्रपट देशभरात पक्त 61.36 कोटी रुपये कमवू शकला. अलीकडेच हॉलिवूड रिपोर्टर इंडियाने आयोजित केलेल्या ॲक्टर्स राऊंडटेबलमध्ये करीना कपूर सहभागी झाली होती. यादरम्यान तिने ‘लाल सिंह चड्ढा’साठी आमिर खानचे कौतुक केले आणि तो एक उत्कृष्ट अभिनेता असल्याचेही तिने नमूद केलं.
चित्रपट चालला नाही तर बोलणं बंद करणार नाहीस ना..
हा चित्रपट प्रदर्शित तर झाला पण फ्लॉप ठरला. त्यानंतर करीनाची आमिरशी भेट झाली, तेव्हा आमिर मजेत तिला म्हणाला, ‘ आपला पिक्चर तर चालला नाही, पण तू माझ्याशी बोलशील ना ग ?’ त्यावर करीनानेही त्याला थेट उत्तर दिलं, बॉक्स ऑफीसवर पिक्चर कसा चालतो त्यावर मी लोकांशी नातं जोडत नाही रे. यावेळी करिनाने ‘रुपा’ च्या भूमिकेबद्दल आबारही मानले. ती म्हणाली की मला वाटतं की म्हणून रूपाच्या पात्राने एक अभिनेत्री म्हणून मला रोहित शेट्टीच्या ‘सिंघम अगेन’ कॉप ड्रामापेक्षा जास्त दिलं. आम्ही सर्वांनी उत्तम, मनापासून काम केलं. हा चित्रपट मोठा पल्ला गाठेल असं आम्हाला सर्वांनाच वाटत होतं, पण ते खरं झालं नाही.
पिक्चर सोडण्याचाही आला होता विचार
लाल सिंग चड्ढा बद्दल बोलताना करीना म्हणाली की , चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ती दुसऱ्यांदा गरोदर होती. त्यावेळी चित्रपटाचे 60 टक्के शूटिंग झाले होते. सैफशी बोलणं झाल्यावर मी आमिरला फोन करून ही बातमी दिली आणि दुसरी अभिनेत्री घेण्याबद्दल सुचवलं. पण उलट आमिरने आधी माझं अभिनंदन केलं आणि मला सांगितलं की या चित्रपटासाठी मी तुझी वाट पाहीन, अशी आठवण करीनाने सांगितली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List