EVM बंद करून बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, कॉंग्रेसची रत्नागिरीत स्वाक्षरी मोहिम
मारकडवाडीमध्ये EVM मशीनच्या विरोधात एल्गार पुकारल्यानंतर इव्हिएम विरोधात वातावरण तापले असून त्याचे पडसाद राज्य भरात उमटायला सुरुवात झाली आहे. याच अनुषंगाने इव्हिएम बंद करून निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या अशी मागणी करत कॉंग्रेसने आज रत्नागिरीत स्वाक्षरी मोहिम सुरू केली. नागरिकांनी या स्वाक्षरी मोहिमेला चांगला प्रतिसाद दिला.
सर्व निवडणूका इव्हिएम बंद करुन बॅलेट पेपरवर घेण्याच्या मागणीसाठी रत्नागिरी शहर व ग्रामीण भागात सह्यांची मोहीम सुरू करण्यात आली. जिल्हा उपाध्यक्ष हारीस शेकासन व महिला प्रदेश सरचिटणीस रुपाली सावंत यांच्या नेतृत्वाखाली आज कॉंग्रेस भवन येथे स्वाक्षरी मोहिम पार पडली. यावेळी शहराध्यक्ष रमेश शाहा, जिल्हा उपाध्यक्ष हारीस शेकासन, ओबीसी विभागाचे उपाध्यक्ष दिपक राऊत यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना इव्हिएम बंद करुन बॅलेट पेपरवर निवडणूका घेण्याच्या कॉंग्रेस पक्षाच्या मागणी बाबतची वस्तुस्थिति सांगितली. या वेळी महिला प्रदेश सरचिटणीस रुपाली सावंत, तालुका सरचिटणीस काका तोडणकर, आतिफ साखरकर, अस्लम शेख, सुदेश ओसवाल, अनिता शिंदे, जैनुद्दीन सारंग, फहिम, सोनाली, अजहर वस्ता, मेहबूब खतीब व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List